#Mamta vs CBI : मोदी विरोधकांची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – सीबीआय पथक काेलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेले होते. दरम्यान या पथकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर मात्र राजकीय वातावरण भलतेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच प्रकरणी आज दुसर्‍या दिवशी ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ दिल्‍लीत विरोधकांची शरद पवार यांच्या बंगाल्यावर बैठक आयोजित केल्याची माहिती समजत आहे.

या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकशाही व्‍यवस्‍थेवर घाला घातला जात आहे अशी टीक पवार यांनी मोदींवर केली आहे. दरम्यान कोलकात्यामध्ये सुरू असलेल्या सीबीआय विरुद्ध बंगाल पोलीस या राजकीय नाट्याचे पडसाद आता संसदेतही उमटायला लागल्याचे दिसत आहे.

ममता बॅनर्जींनी धरणे आंदोलन सुरू केलं

दरम्यान राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या सीबीआय पोलिसांनाच बंगाल पोलिसांनी अटक केली. यानंतर सीबीआय पोलीस आणि बंगाल पोलीस यांच्यात कारवाई सत्र सुरू झाले. यानंतर सीबीआय पोलीस आणि बंगाल पोलिसांनी एकामेकावर एका रात्रीत अनेक कारवाया केल्याचं चित्र पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर या छापासत्राचा विरोध करण्यासाठी ममता बॅनर्जींनी धरणे आंदोलन सुरू केलं. दरम्यान सरकार सीबीआयचा गैरवापर करत आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like