Atal Pension Yojana (APY) | 99 लाख लोक एका वर्षात झाले सहभागी, ‘हिट’ पेन्शन स्कीम असल्याचा मोदी सरकारचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Atal Pension Yojana (APY) | प्रत्येक व्यक्तीला म्हातारपणी आरामदायी जीवन जगायचे असते. ज्या जीवनात पैशाचे टेन्शन नसते. तुमचेही तेच स्वप्न असेल तर अटल पेन्शन योजना तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. सेवानिवृत्तीनंतर सुरक्षित जीवन जगू इच्छिणार्‍या लोकांना या योजनेत पैसे गुंतवून दर महिना 5 हजार रुपये पेन्शन (Pension) मिळू शकते. केंद्राची ही योजना लोकांच्या पसंतीस उतरत असून त्यात सामील होणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. Atal Pension Yojana (APY)

 

4 कोटींच्या पुढे गेले सबस्क्रायबर्स
या योजनेत सामील होणार्‍या ग्राहकांची संख्या पाहिली तर ती सातत्याने वाढत आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस, त्यात सामील होणार्‍या सदस्यांची संख्या 4 कोटीच्या पुढे गेली आहे. पेन्शन फंड रेग्युलेटर (पीएफआरडीए) नुसार, 2021-22 मध्ये 99 लाखांहून अधिक एपीवाय खाती उघडण्यात आली.

 

अशाप्रकारे, वर्षानुवर्षे वाढ होत असताना, मार्च 2022 पर्यंत, या योजनेच्या ग्राहकांची संख्या 4.01 कोटींवर पोहोचली आहे. 2020-21 मध्ये 79 लाखांहून अधिक लोक या योजनेशी जोडले गेले होते, तर 2018-19 मध्ये ही संख्या 70 लाख होती.

 

2015 मध्ये लाँच झाली योजना
अटल पेन्शन योजना ही एक सरकारी योजना आहे आणि ती 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आली. असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना डोळ्यासमोर ठेवून अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली. Atal Pension Yojana (APY)

 

मात्र आता 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक याचा लाभ घेऊ शकतो. ज्यांचे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते आहे ते लोक यात सहज गुंतवणूक करू शकतात आणि त्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करू शकतात.

 

एपीवाय योजनेअंतर्गत, ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते. मात्र, त्यात केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. यामध्ये तुम्हाला किमान 1,000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.

लवकर गुंतवणुकीचे अधिक फायदे
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही या योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितका जास्त फायदा होईल. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळेल. यासाठी तुम्हाला दरमहा केवळ 210 रुपये जमा करावे लागतील.

 

दुसरीकडे, 1000 रुपये मासिक पेन्शन मिळविण्यासाठी, तुम्हाला 42 रुपये जमा करावे लागतील, 2000 रुपये मासिक पेन्शनसाठी रुपये 84 रुपये, 3000 मासिक पेन्शनसाठी 126 रुपये आणि 4000 रुपये पेन्शनसाठी दरमहा 168 रुपये जमा करावे लागतील.

 

80सी अंतर्गत कर लाभ
अटल पेन्शन योजना (एपीवाय) मध्ये गुंतवणुकीवर प्राप्तीकर कायदा 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर लाभाची सुविधा देखील आहे.
दुसरीकडे, जर गुंतवणूकदाराचा 60 वर्षापूर्वी मृत्यू झाला तर त्याचा/तिचा जोडीदार या योजनेत गुंतवणूक करणे सुरू ठेवू शकतो.

 

याशिवाय, पत्नी/पती देखील एकरकमी रकमेचा दावा करू शकतात.
या योजनेत खाते उघडण्यासाठी, तुमचे बचत खाते असलेल्या बँकेत जाऊन एपीवाय नोंदणी फॉर्म भरावा लागेल.
आता ऑनलाईन देखील या योजनेत सहभागी होता येते.

 

अर्ज करण्यासाठी पात्रता

भारताचा नागरिक असणे आवश्यक.

अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.

बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे.

अर्जदाराकडे मोबाईल क्रमांक असणे आवश्यक.

आधीपासून अटल पेन्शनचा लाभार्थी नसावा.

किमान योगदान कालावधी 20 वर्षे.

 

Web Title :- Atal Pension Yojana (APY) | atal pension yojana is best retirement investment plan will get rs 5000 pension per month

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Stamp Duty | मुद्रांक शुल्क चुकविल्याच्या प्रकरणातील दंडात 90 टक्के सवलत जुलै अखेरपर्यंतच

 

Cyber Insurance Policy | ऑनलाईन फ्रॉडचे नुकसान टाळायचे असेल तर घ्या सायबर विमा पॉलिसी, जाणून घ्या तिचे फायदे

 

Pune -Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूर प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात, अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू