Pune -Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूर प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात, अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune -Solapur Highway Accident | शासकीय कामासाठी पुणे येथे जात असताना प्रांताधिकारी नंबर दोन यांच्या वाहनाला सोलापूर-पुणे महामार्गावरील (Pune -Solapur Highway Accident) भिगवण जवळ (Bhigwan) अपघात झाला. या अपघातात एका अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू (Top Clerk Death) झाला तर दुसरे अव्वल कारकून गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि.20) सकाळी झाला.

 

उमेश वैद्य Umesh Vaidya (वय-48 रा. मोहित नगर, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या अव्वल कारकून चे नाव आहे. तर राजकुमार वाघमारे (Rajkumar Waghmare) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोघेही मंगळवारी सकाळी एमएच 13 बीक्यू 0097 या प्रांताधिकारी (Provincial Officer) क्रमांक दोन यांच्या वाहनातून शासकीय कामाकाजासाठी पुण्याला गेले होते.

दरम्यान, ते भिगवण जवळ आले असता त्यांच्या गाडीला कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना उमेश वैद्य यांचा मृत्यू झाला.

 

दरम्यान, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Solapur Collector Milind Shambharkar)
यांनी या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील (Indapur Tehsildar Shrikant Patil) यांच्याशी संपर्क साधला.
जखमीवर इंदापूर येथे उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने या वाहनामध्ये प्रांताधिकारी सुमित शिंदे (Sumit Shinde) नव्हते.

 

Web Title :- Pune -Solapur Highway Accident | accident on pune solapur highway near bhigwan provincial officials car death of the clerk on the spot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prithviraj Chavan | ‘घाईगडबडीमध्ये राजीनामा देवून उध्दव ठाकरेंनी फार मोठी चुक केली’ – पृथ्वीराज चव्हाण

 

RBI Digital Currency | देशात लवकरच सुरू होणार डिजिटल करन्सी, घाऊक आणि किरकोळ क्षेत्रासाठी टप्प्याटप्प्याने होत आहे काम

 

Work From Home New Rule | WFH बाबत आला सरकारचा नवीन नियम, 50% कर्मचार्‍यांनी ऑफिसमध्ये येणे आवश्यक