Atal Pension Yojana | ‘या’ सरकारी योजनेत दरमहिना जमा करा 210 रुपये; पती-पत्नी दोघांना मिळेल 10,000 रू. पेन्शन, समजून घ्या गणित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Atal Pension Yojana | जर तुम्हाला सुद्धा निवृत्तीनंतर पेन्शन पाहिजे असेल तर या सरकारी योजनेत पैसे जमा करून तुम्ही दरमहिना एक चांगली रक्कम मिळवू शकता. या योजनेंतर्गत पती-पत्नी दोघांना लाभ मिळू शकतो. (Atal Pension Yojana)

 

यासाठी सरकारी नोकरीची आवश्यकता नाही. या अंतर्गत नोकरी न करणारे सुद्धा पेन्शन मिळवू शकतात. या सरकारी योजनेत दर महिना 210 रुपयांचे योगदान द्यावे लागेल आणि जेव्हा या योजनेंतर्गत पेन्शनची वेळ येईल तेव्हा तुमच्या खात्यात रोजचा खर्च भागवण्याइतके पैसे येतील.

 

काय आहे ही सरकारी योजना?
केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) गुंतवणूक करून लोक 60 वयानंतर वृद्धत्वात पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. यात पती-पत्नी दोघांनी गुंतवणूक केली तर 60 वर्षानंतर दोघांनी मिळून 10,000 रुपये महिन्याची पेन्शन मिळते.

 

योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असावे.
कोणत्याही बँकेत किंवा पोस्टात खाते उघडून याचा लाभ घेता येऊ शकतो.

अटल पेन्शन योजनेचा लाभ
अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) गुंतवणूक करून लोक 60 वयानंतर वृद्धत्वात 1000-5000 रुपये पेन्शनचा लाभ घेऊ शकतात.
आयकर कायदा, कलम 80 सीसीडी (1बी) अंतर्गत या योजनेत करात सवलत मिळते.

 

पती-पत्नीला मिळेल 10,000 रुपये पेन्शन
योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असावे.
या योजनेत सहभागी होणार्‍यांना वयाच्या 60 वर्षानंतर 5000 रुपये महिना पेन्शन मिळेल.
जर योजनेचा लाभ घेणार्‍या व्यक्तीचे वय 18 वर्ष आहे तर त्यास 210 रुपये महिना गुंतवणूक करावी लागेल.

39 वर्षापेक्षा कमी वयाचे पती-पत्नी वेगवेगळे या योजनेत 420 रूपये जमा करून 60 वर्षाच्या वयानंतर दरमहिना 10,000 रूपये पेन्शन घेऊ शकतात.

 

Web Title :- Atal Pension Yojana | in atal pension government scheme deposit rs 210 every month both husband and wife will get a pension of 10000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

OBC Reservation Maharashtra | ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका ! OBC आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

Omicron Variant in Maharashtra | ‘जिनोम सिक्वेन्सिंगच्या लॅब वाढवणार’; मुलांच्या लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

Nawab Malik | समीर वानखेडे चैत्यभूमीवर पहिल्यांदा दिसले, नमाजाला मात्र नियमित दिसायचे; नवाब मलिकांचा वानखेडेंवर निशाणा

Post Office Scheme | विना जोखीम बँकेपेक्षा सुद्धा जास्त मिळवायचा असेल FD वर रिटर्न, तर Post Office मधून मिळवू शकता जास्त नफा! जाणून घ्या कसा?