ATM मधून सारखे पैसे काढताय ? तुमची फसवणूक रोखण्यासाठी बँकांनी सुचवला ‘हा’ उपाय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एटीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे तसेच फसवणूक होत असते. यामुळे यांना आळा घालण्यासाठी तसेच फसवणूक रोखण्यासाठी दिल्ली स्टेट लेवल बँकर्स कमिटीने काही उपाय समोर आणले आहेत. या कमिटीने असा उपाय सुचवला आहे की, जर तुम्ही एकदा एटीएममधून पैसे काढले असतील तर 6 ते 12 तासांच्या अवधीनंतरच पुन्हा पैसे काढता येतील.

एटीएममधून सर्वात जास्त फसवणूक हि रात्रीच्या वेळी होत असते. यामुळे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) चे एमडी आणि सीईओ मुकेश कुमार जैन याविषयी बोलताना सांगितले कि, व्यवहाराच्या वेळा वाढवून आपण या फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालू शकतो. यासाठी मागील महिन्यात 18 बँकांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली होती. यानंतर आता हा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला असून जर याला मान्यता मिळाली तर यापुढे एकाचवेळी दोन ट्रांजैक्शन करता येणार नाही.

2018-19 दरम्यान फसवणुकीत वाढ

2018-19 या आर्थिक वर्षादरम्यान फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली असून दिल्लीमध्ये 179 प्रकार उघडकीस आले असून महाराष्ट्रात 233 घटना समोर आल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी नागरिकांच्या एटीएम कार्डचे क्लोनिंग करून फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

याचबरोबर दुसरे देखील अनेक उपाय सुचवण्यात आले असून जर कुणी तुमच्या खात्यातून पैसे काढत असेल तर तुम्हाला अलर्ट करण्यासाठी एक ओटीपी पाठविला जाईल. यामुळे तुम्हाला फसवणूक होण्यापासून सावध करण्यात येईल. याशिवाय बँकर्स एटीएमसाठी सेंट्रलाइज मॉनिटरिंग सिस्टमवरही चर्चा करण्यात आली. याआधी अनेक बँकांकडे हि पद्धत असून प्रत्येक बँकेने हि सिस्टीम वापरल्यास ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –