देहूरोड की ‘बिहार’ टोळक्यांकडून एटीएम आणि वाहनांची तोडफोड

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा आॅनलाईन

पिंपरी-चिंचवड परिसरातील देहूरोड हे ‘बिहार’ होण्याच्या मार्गावर आहे. दिवसा नंग्या तलवारी,कोयते, हॉकीस्टिक हे घेऊन तरुण फिरताना दिसतात,अश्या परिस्थितीमध्ये पोलीस मात्र मूग गिळून गप्प आहेत.देहूरोड मध्ये शुक्रवारी मयत अल्पवयीन गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करताना त्या परिसरातील दुचाकींची धारदार शस्त्रांनी तोडफोड केली होती. या घटनेला काही तास होत नाहीत की,त्याच परिसरातील दोन एटीएम आणि दुचाक्यांची तोडफोड एका अज्ञात टोळक्याने केली आहे.

देहूरोड येथे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी काही दिवसांपूर्वीच येथील सूत्र आपल्या हाती घेतले आहेत,ते अगोदर मंचर येथे कार्यरत होते.आपली झलक दाखवण्यासाठी त्यांनी हुक्काबारवर धडक कारवाई केली होती.परंतु ते आल्यापासून तोडफोडीच्या सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.दिवसा नंग्या तलवारी घेऊन फिरणे,वाहनांची तोडफोड,मारहाण या घटना सतत सुरूच आहे.शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास अबुशेठ रोडवर असलेल्या दोन दुचाक्यांची तोडफाड करत एटीएम ला टोळक्याने लक्ष केले आहे.या टोळक्यांचा मनात पोलिसांनविषयी भीती नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे ते बिनधास्तपणे वावरत असतात.घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.मात्र अद्याप या प्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आले नाही.या परिसरात जीव मुठीत घेऊन नागरिक वावरत आहेत.त्यामुळे या परिसरात पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.गस्तीचे प्रमाण वाढवावे अस देखील नागरिक म्हणाले.नाहीतर काही दिवसात देहूरोड हे बिहार होणार हे नक्क्की. अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.