Atrangi Re | पतिच्या लग्नात सारा अली खानचा जबरदस्त डान्स, चित्रपटातील पहिलं गाणं ‘चका-चक’ प्रदर्शित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Atrangi Re | सारा अलि खान (Sara Ali Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि धनुष (Dhanush) यांचा ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) चित्रपटाचा ट्रेलर (Trailor) काही दिवसांपुर्वीच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने लोकांना प्रचंड भुरळ घातली. अशातच आता या चित्रपटातील पहिलं गाणं (Song) प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचे बोल ‘चका-चक’ (Chaka-Chak) असे आहेत.

 

प्रदर्शित झालेल्या गाण्यामध्ये सारा अली खान तिचा पति धनुषच्या साखरपुड्यामध्ये जबरदस्त डान्स (Dance) करत असल्याचं दिसत आहे.
या गाण्याची सुरुवात होण्याआधी मी पहिली पत्नी असेल जी तिच्या पतिच्या लग्नात इतकी खूश आहे, असं साराने म्हटलं आहे.
या गाण्यामध्ये साराने पिवळ्या रंगाची साडी (Yellow Sari) परिधान केली आहे. तर अतिशय बिंदास्त अंदांमध्ये तिने डान्स केला आहे. (Atrangi Re)

 

‘चका-चक’ हे गाणं ए आर रेहमान (A.R Rehmaan) आणि त्याच्या टीमद्वारे बनवण्यात आलं आहे. तर गाण्यामध्ये डान्स करताना सारा तिच्या पतीला छेडताना दिसत आहे.
अतिशय एनर्जेटीक आणि फ्रेश मुडमध्ये सारा डान्स करताना दिसत आहे. हे गाणं प्रदर्शित होताच लोकांच्या ओठांवर आलं आहे.

 

‘अतरंगी रे’ (Atrangi Re) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लोकांनी त्याला डोक्यावर उचलला होता. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक होते.
मात्र महामारीच्या काळात चित्रपट प्रदर्शित करता न आल्याने हा चित्रपट ओटीटीवर (OTT Platform) प्रदर्शित करण्यात आला.
तिथं देखील मोठ्या प्रमाणात या चित्रपटाला प्रतिसाद मिळाला.

 

Web Title : Atrangi Re | atrangi re chaka chak song release see sara ali khan dance moves in song composed by a r rahman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Airport | पुणे विमानतळ 1 डिसेंबर पासून 24 X 7 सुरु राहणार

NCP MLA Babajani Durrani | आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राष्ट्रवादी सोडल्याच्या चर्चेला सोशल मीडियावर उधान; उधाण, प्रचंड खळबळ

Indian Railway | देशात पहिल्यांदा मातीच्या डोंगराखाली रेल्वे बनवत आहे सर्वात मोठा बोगदा, जाणून घ्या कुठे?