Maharashtra Politics News | अजित पवारांच्या भेटने राजकीय चर्चांना उधाण, अशोक चव्हाणांचा खुलासा, म्हणाले – ‘या भेटीत मी लोकसभेच्या…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | काँग्रेस नेते (Congress) आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former CM Ashok Chavan) यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. अशोक चव्हाण यांनी कुठल्या कारणासाठी अजित पवार यांची भेट घेतली याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. (Maharashtra Politics News) दरम्यान, या भेटीबाबत स्वत: अशोक चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना कारण सांगितले. ते बुधवारी (दि.28) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

 

अशोक चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढण्याची मानसिकता आहे. (Maharashtra Politics News) अजित पवारांचीही तशी अनुकुल भूमिका आहे. उद्धव ठाकरेंचीही (Uddhav Thackeray) तीच भूमिका आहे. 17 जुलैपासून अधिवेशन आहे. त्यापूर्वी आम्हाला एकत्र बसायचं आहे. अधिवेशनाचा अजेंडा काय असावा याविषयीही चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

 

काँग्रेसमधील चर्चेची माहिती दिली

अशोक चव्हाण म्हणाले, या भेटीत मी लोकसभेच्या (Lok Sabha Elections) पूर्वतयारी संदर्भात काँग्रेसमध्ये आतापर्यंत जी काही चर्चा झाली याची माहिती अजित पवार यांना दिली. तसेच विधानसभा (Assembly Elections) पूर्वतयारीची महाविकास आघाडीची बैठक आम्हाला घ्यायची आहे. ती बैठक कधी घ्यायची यावर चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

जागानिहाय चर्चा नाही

कोण कोणती जागा लढवणार अशी जागानिहाय चर्चा झाली नाही. तसा प्रश्नच नाही, कारण तशी चर्चा व्हायची असेल तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ नेते आणि मी असे तिघे असू तेव्हाच यासंदर्भात चर्चा होऊ शकते. आज केवळ काय विचार आहे यावर चर्चा झाली. जागावाटपाबाबत कोणतीही सखोल चर्चा झालेली नाही. काय करणं सोयीचे राहिल याबाबत चर्चा झाल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

तिघांना तडजोड करावी लागेल

ज्या जागांवर आमचा खासदार त्या जागा आम्हाला हव्या, अशी शिवसेना ठाकरे गटाची (Shiv Sena Thackeray Group) भूमिका असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, ज्या जगांवर आमचा खासदार त्या जागा आम्हालाच हव्या, असं अद्याप काहीही नाही. हे त्यांचे मत आहे. एकदा चर्चेला बसलं की तो देखील विषय मार्गी लागेल. राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्या स्थितीनुसार, तिघांनाही तडजोड करावी लागेल. राज्यातील राजकीय परिस्थिती आणि मेरिट या दोन्ही गोष्टींचा विचार झाला तर योग्य होईल, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | congress leader ashok-chavan-tell-reasons-of-meeting-with-ncp-ajit-pawar-in-mumbai


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा