Attack On Sandeep Deshpande | देशपांडेवरील हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांची चौकशी करा, मनसे नेत्याची पोलिसांकडे मागणी; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेचे (MNS) सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी (दि.3) सकाळी मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) मॉर्निंग वॉकदरम्यान हल्ला (Attack On Sandeep Deshpande) झाला. देशपांडे याच्यावरील हल्ल्या प्रकरणी मनसेचे अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी गंभीर आरोप केला आहे. अमेय खोपकर यांनी संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी (Attack On Sandeep Deshpande) ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी जर यामध्ये तथ्य निघालं तर त्यांना अटक करावी, अशी मागणी खोपकर यांनी केली आहे.

संदीप देशपांडे हे मुंबई महापालिकेचे (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. याच कारणामुळे त्यांच्यावर हल्ला (Attack On Sandeep Deshpande) झाला असण्याची शक्यता आहे. देशपांडे गप्प बसणारा माणूस नाही. मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि प्रशासनाने संदीप देशपांडे यांना योग्य ती सुरक्षा पुरवावी. पण त्यापूर्वी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी. हल्ल्याच्या कटात त्यांचा सहभाग असल्याचे आढळून आले तर त्यांना अटक करावी असेही अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.

 

तसेच मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे या आमच्या सहकाऱ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत असल्याचे खोपकर यांनी म्हटले.
संदीप या हल्ल्यातून सावरेल याची पूर्ण काळजी आम्ही घेत आहोत. पण हे घाणेरडं राजकारण आता थांबलंच पाहिजे.
सुपाऱ्या देऊन प्राणघातक हल्ले करण्याचं हे गुंडगिरीचं राजकारण आम्ही कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा खोपकर यांनी दिला आहे.

 

 

Web Title :- Attack On Sandeep Deshpande | attack on sandeep deshpande investigate aaditya thackeray and sanjay raut demands mns leader ameya khopkar to the mumbai police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MNS Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला; रॉड आणि स्टम्पने केली मारहाण

Aurangabad ACB Trap | पेन्शन मंजूर करुन आणण्यासाठी लाचेची मागणी, कृषी अधिकारी कार्यालयातील लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची 14.50 कोटींची फसवणूक, पाषाण परिसरातील प्रकार