Aurangabad ACB Trap | पेन्शन मंजूर करुन आणण्यासाठी लाचेची मागणी, कृषी अधिकारी कार्यालयातील लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – पेन्शन मंजूर (Pension Granted) करुन आणण्यासाठी पाच हजार रुपये लचेची मागणी करुन साडेचार हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) सिल्लोड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad ACB Trap) रंगेहाथ पकडले. काकाराव बाजीराव जिवरग Kakarao Bajirao Jivarag (वय-52) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद एसीबीने (Aurangabad ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि.2) केली.

 

याबाबत 35 वर्षीय व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या वडिलांची पेन्शन मंजूर करुन आणण्यासाठी सेवा पुस्तक (Service Book) ऑनलाईन करुन नागपूर कार्यालयास पाठवण्यासाठी काकाराव जिवरग याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती साडेचार हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता काकाराव जिवरग याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना कनिष्ठ लिपिक काकाराव जिवरग याला रंगेहाथ पकडले.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe),
पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित (DySP Maruti Pandit)
यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद एसीबीचे पोलीस उप अधीक्षक दिलीप साबळे (DySP Dilip Sable),
पोलीस निरीक्षक दिपाली निकम (Police Inspector Dipali Nikam), पोलीस अंमलदार रवींद्र काळे,
सुनील पाटील, शिरीष वाघ, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Aurangabad ACB Trap | Clerk in Agriculture Officer’s office caught in anti-corruption net, demanding bribe to get pension sanctioned

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Chinchwad Bypoll Election | बंडखोरी झाली नसती तर विजय आमचाच होता, निकालानंतर नाना काटेंची प्रतिक्रिया

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी अभियानास सुरुवात, 1 हजार विद्यार्थ्यांना दिली शपथ

Chhatrapati Sambhajinagar Crime News | सैराटची पुनरावृत्ती ! प्रेमप्रकरणातून एका 16 वर्षीय युवकाचा खून