पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख

पुणे : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, समाजाचा आरसा आहे. कोरोना महामारीमध्ये पत्रकार जीव धोक्यात घालून समाजाच्या विविध प्रश्नांसह समस्यांचे वार्तांकन करीत आहेत. पत्रकारांना पूर्णतः संरक्षण असणार आहे. मात्र, त्याचा गैरवापर कोणी करू नये. पत्रकारांवर कोणी हल्ला केला तर त्याची गय केली जाणार नाही, असे मत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केले.

राज्य मराठी पत्रकार परिषदेची पुणे जिल्हास्तरीय ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीमध्ये ४५ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे राज्य उपाध्यक्ष सुनील थोरात, जिल्हाध्यक्ष विजयराव लोखंडे, उपाध्यक्ष सुनील भंडारे पाटील, उपाध्यक्ष नितीन करडे, संपर्कप्रमुख उदयकांत ब्राम्हणे, कार्याध्यक्ष गजानन गव्हाणे पाटील, गणेश तिखे, प्रशांत तुपे, ज्ञानेश्वर पाटेकर, प्रविण शेंडगे, नंदु बोऱ्हाडे, गौतम पिसे, शंकर पाबळे, विजय थोरात, पौर्णिमा कांबळे, जिल्हा महिला मंचच्या जिल्हाध्यक्ष अनिता सोनवणे, सल्लागार मोहिनी भोसले, उपाध्यक्षा अलका सोनवणे, कार्याध्यक्षा शीतल शेडगे, संपर्कप्रमुख आशा थोपटे, दीपाली नलवडे, रेश्मा लिमकर, निलिमा अलुलकर, मंगल पवार, रेश्मा खान, सुषमा बुर्डे, आसमाँ शेख, सोनाली सोनवणे, राणी साळुंके, कल्पना बहिरट, फेमिदा खान, सारिका मेंढेकर, सुमन प्रसाद, सुचिता पवार, सुषमा भालेकर, रोहिणी मदने, सुनंदा पाटील, शबाना अश्रफी उपस्थित होते. महिला मंचच्या जिल्हाध्यक्ष अनिता सोनवणे आणि नितीन करडे यांनी मानले.

पत्रकार परिषद संलग्न महिला मंचच्या महिलांना पोलीस स्टेशनच्या भरोसा समितीवर घेण्याचा प्रयत्न करू महिलांचे हक्क व संरक्षण जपण्याला प्राधान्य दिले जात आहे. पत्रकार परिषदेला संलग्न असलेल्या पुणे जिल्हा महिला मंचच्या पदाधिकारी काम करण्यासाठी तयार असतील, तर त्यांना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या भरोसा किंवा इतर महिला समित्यांवर घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल. महिलांचे विविध प्रश्न, समस्या सोडवून महिलांना न्याय देण्याच्याच दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. महिला मंचची जिल्ह्यात चांगली कामगिरी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.