हिरो मोटो कॉर्पच्या बनावट वेबसाईटद्वारे व्यापा-यांना गंडविण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

हिरो मोटो कॉर्पची बनावट वेबसाईट बनवून फ्रँचायजी देण्याच्या नावाखाली व्यापा-यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. कंपनीचे खरे युआरएल heromotocorp.com असे असताना ठगांनी heromotocorps.com असे केवळ एस जोडून हुबेहुब युआरएल बनवत हा गंडा घातला आहे. दिल्ली पोलीस या ठगांचा शोध घेत आहेत. या बनावट वेबसाईटची माहिती मिळताच पोलिसांनी ही वेबसाईट बंद करण्याचा सूचना दिल्यानंतर आता ती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे त्याद्वारे व्यापा-यांना गंडविण्याचा प्रकार बंद झाला असला तरी आतापर्यंत किती व्यापा-यांना या ठगांनी गंडविले याची माहिती पुढे आलेली नाही.

बनावट वेबसाईटवर ख-या वेबसाईटनुसार नव्या शोरुमसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. तसेच हुबेहुब माहिती भरण्याचे रकानेही ठेवण्यात आले होते. याचबरोबर २ लाख रुपये अनामत रक्कम भरण्यास सांगण्यात आली होती. हा अर्ज भरणा-या लोकांना या ठगांनी आॅनलाईन आणि फोनद्वारे संपर्क साधला होता. तसेच दोन लाख रुपये आता भरावेत, ते पुन्हा परत करण्यात येतील असेही सांगण्यात आले होते. यामुळे काही व्यापारी सतर्क झाले व त्यांनी पोलिसांना याची कल्पना दिली. यानंतर हे प्रकरण उघड झाले.

[amazon_link asins=’B00KGZZ824,B07GB9Z17Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2cb7100c-bb07-11e8-8522-1913fb89469c’]
या बनावट युआरएलला एका प्रसिद्ध डोमेन रजिस्टर आणि वेब होस्टिंग कंपनीद्वारे बनविण्यात आले होते. या वेबसाईटला 7 जूनला बनविण्यात आले होते. पोलीस वेबसाईटचा आयपी अ‍ॅड्रेस आणि व्यापा-यांना केलेल्या फोन नंबरची माहीती गोळा करत आहे. हिरो मोटो ही हिरो मोटारसायकल बनविणा-या कंपनीची वेबसाईट आहे.

दरोडेखोरांच्या हल्ल्यात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू ; पत्नी गंभीर जखमी