सावधान ! तुमचंही फेसबुक अकाउंट होऊ शकत हॅक

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – युझर्सच्या डेटा चोरी प्रकरणी काही महिन्यांपूर्वी अडचणीत आलेल्या फेसबुकवर आणखी एक मोठे संकट आले आहे. युझर्सच्या डेटा चोरीची आणि त्याचा चुकीचा वापर केल्याचा आणखी एक अहवाल समोर आला आहे.सोशल मीडियाचा वापर करणे दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललं आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुकवरुन युजर्सचा डेटा चोरी केला जात असून, त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. धक्कादायक म्हणजे, तब्बल ८१ हजार युजर्सचं अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. हे सर्व अकाऊंट हॅक करुन युजर्सच्या मेसेज बॉक्समधील खासगी मेसेज विकले जात आहेत. ही माहिती प्रत्येक अकाऊंटमागे ६ रुपये ५० पैशांमध्ये विकली जात आहे. ज्या वेबसाईटला हा डेटा विकला गेला ती कंपनी पीटर्सबर्ग येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.  या प्रकारामुळे पुन्हा एकदा फेसबुकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
युझर्सच्या डेटा चोरीचे प्रकरण गेल्या वर्षीय सप्टेंबर महिन्यात उघडकीस आले होते. ‘एफबीसेलर’ ( FBSaler ) नावाच्या एका युझरने इंटरनेट फोरमला याची माहिती दिली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार फेसबुकवरील १२ कोटी खात्यांची माहिती विकली जात आहे. अर्थात त्यानंतर सायबर सुरक्षा कंपनी डिजिटल शॅडोजने या प्रकरणाचा तपास केला तेव्हा एकूण ८१ हजार खाती आणि त्यातील पर्सनल मेसेज विकल्याचे समोर आले.
बीबीसीने माहिती पडताळून पाहण्यासाठी डेटा विकण्यात आलेल्या पाच फेसबुक युजर्सना संपर्क साधला. त्यांच्या नावे असणारे मेसेज दाखवले असता हे आपलेच मेसेज असल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे यामध्ये फक्त मेसेज नाही तर फोटोंचाही समावेश होता. ज्या युजर्सचा डेटा विकला जात आहे ते प्रामुख्याने यूक्रेन, रशिया, यूके, अमेरिका आणि ब्राझील देशातील आहेत. इतर देशांमध्येही हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.
फेसबुकने दिले स्पष्टीकरण –
या संपूर्ण प्रकरणावर फेसबुकने स्पष्टीकरण दिले आहे. त्याच्या मते अशा प्रकारे कोणतेही अकाऊंट हॅक झालेले नाही. तसेच जो डेटा बाहेर आला आहे त्यात त्यांची कोणतीही चुक नाही.

जाहिरात