Aurangabad ACB Trap | 75 हजार रुपये लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अँन्टी करप्शनच्या पथकाने पाठलाग करुन पकडलं, गाडीत सापडली लाखोंची रोकड अन् 25 तोळे सोन्याचे दागिने

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच 107 नुसार प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी (Demanding a Bribe) करुन 75 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) पोलीस उपनिरीक्षकाला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. गणेश शेषेराव शिंदे PSI Ganesh Sesherao Shinde (वय-35) असे लाच घेताना पकडलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. औरंगाबाद एसीबीच्या (Aurangabad ACB Trap) पथकाने ही कारवाई बुधवारी (दि.14) केली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत 51 वर्षाच्या व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB Trap) तक्रार केली आहे.
गणेश शेषेराव शिंदे हे कदीम जालना पोलीस ठाण्यात (Kadeem Jalna Police Station) पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल आहे.
या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मिळालेला आहे.
त्यामुळे गणेश शिंदे यांनी तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) कलम 110 ऐवजी कलम 107 प्रमाणे करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाख रुपयाची लाचेची मागणी केली.
तडजोडी अंती 75 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली.

एसबीच्या पथकाने पडताळणी केली असता गणेश शिंदे याने एक लाख रुपये लाचेची मागणी करुन 75 हजार रुपये
स्विकाण्याचे मान्य केले. पथकाने बुधवारी सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर शिंदे याला सापळा पथकाचा संशय आल्याने तो लाचेच्या रकमेसह स्वतःच्या खाजगी वाहनातून पळू गेला.
पथकाने सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून गणेश शिंदे याला पकडले.
गणेश शिंदे याने लाचेची रक्कम पाठलागा दरम्यान फेकून देऊन पुरावा नष्ट केला.
पथकाने पंचासमक्ष आरोपीच्या गाडीची झडती घेतली असता गाडी मध्ये रोख 9 लाख 41 हजार 590 रुपये व 25 तोळे (250 ग्रॅम) सोने मिळून आले आहे.
आरोपी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे याच्यावर कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe), पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित (DySP Maruti Pandit) यांच्या मार्गदर्शनाखाली
औरंगाबाद एसीबीचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर (PI Nandkishore Kshirsagar),
पोलीस अंमलदार नागरगोजे, काळे यांच्या पथकाने केली.

Web Title :-  Aurangabad ACB Trap | ACB chased and caught a police sub-inspector who took a bribe of Rs 75,000 to help in a crime.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडून जिवाला धोका’, भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले -‘माझ्याकडून धोका असू शकतो, पण…’

Deepak Kesarkar | ‘दमानियांना मी उत्तर द्यायला लागलो तर…’, अजित पवारांच्या भाजपासोबत जाणाच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया