ऐतिहासिक ‘बिबी का मकबरा’ची पडझड, पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद शहराची ओळख असलेला ऐतिहासिक ‘बिबी का मकबरा’ची पडझड झाली आहे. यामुळे ऐतिहासिक वस्तूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी कुतूबमिनारचा मनोरा ढासळला. जगातील सातआश्चर्यांपैकी एक ताज महालही पिवळट दिसू लागला आहे. त्यामुळे पर्यटन खातं, पुरातत्व विभाग यांच्या कामगिरीवर शंका उपस्थित होऊ लागली आहे.

खपली निघालेले मिनार, काळवंडलेला मकबरा, पुसट झालेलं नक्षीकाम अशी या इमारतीची दुर्दशा झालेली आहे. ऐतिहासिक वस्तूंच्या सुरक्षेसोबतच संवर्धनाचीही काळजी घेणं हे आपल्या पुरातत्व खात्याचं, पर्यटन विभागाचं कर्तव्य आहे. मात्र या या इमारतीची पडझड होत असताना पुरातत्व विभाग सुस्त बसलेले आहे.

बिबी का मकबरा ‘दख्खनी ताजमहल’ म्हणून ओळखला जातो. १६७९ मध्ये औरंगजेबाचा मुलगा आजम शहाने आपल्या आईच्या स्मरणार्थ ही इमारत बांधली होती. औरंगाबाद शहरातील अनेक पुरातन वास्तूंमधील ‘बिबी का मकबरा’ औरंगाबादचे बोधचिन्ह बनले आहे. ताजमहाल संगमरवरी आहे तर लाल-काळे दगड, संगमरवर आणि पांढऱ्या मातीपासून साकारलेला आहे. या मकबऱ्याच्या सभोवार दगडी बांधकामाची सुरक्षित तटबंदी आहे. तटावरील बांधकामावर घुमट आहेतच. या तटबंदीच्या दक्षिणेकडे सुमारे साडेचार मीटर उंच व आकर्षक प्रवेशद्वार आहे.

आरोग्यविषयक वृत्त :

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन