Aurangabad Crime | पैठण – औरंगाबाद रोडवर महिलेचा खून, प्रचंड खळबळ

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad Crime | औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात (Paithan Taluka) एका 35 वर्षीय महिलेचा डोक्यात प्राणघातक शस्त्राने घाव घालून खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पैठण – औरंगाबाद रस्त्यावरील (Paithan-Aurangabad Road) महानंद दूध शीतकरण केंद्राजवळ (Mahanand Milk Cooling Center) रविवारी (दि.6) रात्री बाराच्या सुमारास (Aurangabad Crime) घडली आहे. याप्रकरणी संशयित पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

अनिता अशोक मुकुटमल Anita Ashok Mukutmal (वय – 35 रा. नवीन कावसान, पैठण) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी संशयित आरोपी अशोक मुकुटमल याला औरंगाबाद .(Aurangabad Crime) येथून ताब्यात घेतले आहे. याबाबत मयत अनिताचा भाऊ नितीन देवराव गायकवाड Nitin Devrao Gaikwad (रा. पैठण) यांनी पैठण पोलीस ठाण्यात (Paithan Police Station) तक्रार दिली असून मयत महिलेचा पती अशोक मुकुटमल याच्यावर संशय व्यक्त केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मयत अनिता मुकुटमल या एका खासगी कंपनीत काम करत होत्या. रविवारी रात्री बाराच्या सुमारास त्या स्कुटीवरुन जात होत्या. पैठणपासून जवळच असलेल्या पैठण – औरंगाबाद रस्त्यावरील महानंद दूध शीतकरण केंद्राजवळ अज्ञात व्यक्तीने अनिता यांच्या डोक्यावर प्राणघातक शस्त्राने घाव घातला. यामध्ये अनिता या जागेवरच बेशुद्ध पडल्या.

यानंतर अज्ञात महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर पवार (Police Inspector Kishore Pawar) यांना समजली. त्यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल (Sub-Divisional Police Officer Dr. Vishal Nehul),
पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे (PSI Ramakrishna Sagade),
अरविंद गटकुळ, सतीश भोसले, सुधाकर चव्हाण, मनोज वैद्य, संजय मदने, विठ्ठल एडके, सुधीर ओव्होळ, चिडे, गणपत भरव
यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या महिलेचा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला.
तसेच या गुन्ह्यात अन्य व्यक्तीचा सहभाग आहे का ? या बाबत पोलीस तपास करीत आहेत.

 

खूनाच्या घटनेत पेट्रोलची बाटली
पैठण शहरामध्ये मागील काही दिवसांत तीन खून झाले आहेत. खून प्रकरणातील मयत व्यक्तीच्या घटनास्थळी व आसपास पेट्रोलने भरलेल्या बाटल्या आढळून येत आहेत.
त्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
यामुळे याबाबत वेगळ्या पद्धतीने तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी दिली.

 

Web Title :- Aurangabad Crime | murder of a married woman on paithan aurangabad road

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा