Pune Crime | दुर्दैवी ! दौंड येथील तलावात बुडुन दोघा चुलत भावांसह तिघांचा मृत्यु

पुणे / दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दौंड नगरपालिकेच्या (Daund Nagarpalika) पाणी साठवण तलावावर (Dam) फोटोशुटसाठी (Photoshoot) गेलेल्या 3 तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला. (Pune Crime)

 

आसरार अलीम काझी (वय 21), करीम अब्दुल हादी फरीद काझी (वय 20) आणि अतिक उझजमा फरीद शेख (वय 20, तिघेही रा. दौंड) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. ही घटना दौंड कुरकुंभ मार्गावरील (Daund-Kurkumbh Road) मोरे वस्तीजवळील नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावावर रविवारी सायंकाळी घडली. (Pune Crime)

 

आसरार व करीम हे सख्ये चुलत भाऊ आहेत. ते दोघे अतिकसह रविवारी 6 मार्च रोजी दुपारी दुचाकीवरुन फिरायला बाहेर गेले होते. सायंकाळ होऊन गेली तरी ते घरी परत न आल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क झाला नाही. ते तिघेही नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावावर जाणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी या परिसरात शोध घेतला. तेव्हा तलावाशेजारी त्यांची दुचाकी, कपडे व बॅग आढळून आली.

हे तरुण पाण्यात बुडले असल्याची शंका आल्याने पोलीस (Pune Rural Police) आणि ग्रामस्थांनी त्यांचा पाण्यात शोध घेतला. तेव्हा त्यांचे मृतदेह पाण्यात आढळून आले. या तिघांपैकी दोघांना पोहता येत नव्हते. हा प्रकार नेमका कसा घडला, याची कोणाला काहीही माहिती नाही. मात्र, पोहता येत नसल्याने त्यात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला व त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या तिसर्‍याचाही मृत्यु झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.

 

Web Title :- Pune Crime | Bad luck Three people including two cousins drowned in a lake at Daund

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा