Devendra Fadnavis | ‘…तर अजित पवार यांना फासावर द्याल का?’; ‘त्या’ प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस सभागृहात संतापले.

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | अमरावतीमध्ये (Amravati) छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा बसवण्यात आला होता. मात्र तो पुतळा हटवण्यात आला. त्यावेळी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (Municipal Commissioner Praveen Ashtikar) यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्यावर 307 गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून आज सभागृहात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला.

 

अमरावतीमध्ये जो काही प्रकार घडला त्यावरून दिल्लीमध्ये (Delhi) असलेल्या आमदारावर गुन्हा दाखल होतो. हा गुन्हा कोणाच्या दबावाखाली दाखल करण्यात आला ?, असं फडणवीस म्हणाले. रवी राणा यांना बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केली.

 

रवी राणा यांच्यावर चुकीचे कलम लावण्याबद्दल फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी (NCP) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चुकीचं काम केलं म्हणजे तुम्ही अजित पवारांना (Ajit Pawar) फासावर लटकावणार का ?, मूळ गुन्हेगारावर (Criminals) किरकोळ कलमे लावली जातात आणि जो आमदार दिल्लीत त्याच्यावर 307 कलम (Section IPC 307) कसं लावू शकता.
पोलीस (Police) बेछूट होतील तर राज्यात काहीच उरणार नाही, असं म्हणत फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री (CM) आणि गृहमंत्र्यावर (Home Minister) टीका केली आहे.
माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी दिला असल्याचं राणा यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | so will Ajit Pawar be hanged Devendra Fadnavis got angry in the House over that issue

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा