Aurangabad Crime News | दारुच्या नशेत महिलेची छेडछाड करणाऱ्या औरंगाबाद एसीपीला ‘एवढ्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad Crime News | दारुच्या नशेत महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबाद पोलीस दलातील (Aurangabad City Police) सहायक पोलीस आयुक्त (ACP – Assistant Commissioner of Police) विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) यांच्यावर रविवारी (दि.15) गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल (Aurangabad Crime News) करुन आज त्यांना अटक (Arrest) केली. विशाल ढुमे यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे.

मित्राच्या 30 वर्षीय पत्नीचा ढुमे यांनी छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तर पीडित महिलेने पोलिसांकडे दिलल्या तक्रारीवरुन सिटी चौक पोलीस ठाण्यात (City Chowk Police Station) फिर्याद दिली आहे. महिलेत्या तक्रारीवरुन गुन्हा (FIR) दाखल करुन पोलिसांनी ढुमे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राजकीय नेत्यांनी केली होती. दरम्यान, आज सकाळी पोलिसांनी ढुमे यांना अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ढुमे यांच्याकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. (Aurangabad Crime News)

काय आहे प्रकरण?

सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे रात्री एका हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मित्र आपल्या पत्नीसोबत त्याठिकाणी आले होते. तिथे दोघांची भेट झाली. ढुमे यांनी आपल्याकडे गाडी नसल्याचे सांगून मित्राकडे लिफ्ट मिळेल का? असे मित्राला विचारले. त्यावेळी मित्राने होकार देत त्यांना आपल्या गाडीत बसवले.

गाडीत बसताना त्यांचा मित्र आणि त्यांची पत्नी पुढच्या सीटवर बसले होते. तर ढुमे मागील सीटवर बसले होते.
दरम्यान, दारुच्या नशेत असलेल्या ढुमे यांनी महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली.
महिलेच्या पाठीवरुन हात फिरवायला सुरुवात केली.
त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर त्यांनी वॉशरुमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चल,
अशी विनंती मित्राला केली. तर घरी गेल्यानंतर तुमच्या बेडरुममधील वॉशरुम मला वापरायचे असल्याचे
म्हणत वॉशरुम वापरण्याची परवानगी मागितली. मात्र, तेथेही ढुमे यांनी महिलेची छेड काढली.
तसेच महिलेच्या पतीला मारहाण केली. हा प्रकार शहरातील एका उच्चभ्रू परिसरात शनिवारी मध्यरात्री घडला.

Advt.

Web Title :- Aurangabad Crime News | aurangabad acp vishal dhume 14 days judicial custody for molesting woman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Graduate Constituency | अखेर काँग्रेस पक्षाकडून सत्यजीत तांबे यांचे निलंबन

Pune Crime News | पुण्यात मांजामुळे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी, रुग्णालायत उपचार सुरु

Nana Patole | ‘बेईमानी करुन दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपला..’, नाना पटोलेंचा इशारा