Aurangabad Crime News | धक्कादायक ! आर्थिक विवंचनेतून शेतकरी दाम्पत्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Aurangabad Crime News | औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धावडा या ठिकाणी शेतकरी दाम्पत्याने आर्थिक विवंचन आणि नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. या शेतकरी दांपत्याने उचलेल्या टोकाच्या पाऊलानंतर दोन मुले आणि दोन मुली पोरकी झाली आहेत. सुरेखा संतोष दळवी ( वय 41 वर्षे) आणि संतोष किसन दळवी ( वय 45 वर्षे, दोघे रा.धावडा) असे मृत शेतकरी दांपत्याची नावं आहे. (Aurangabad Crime News)

काय घडले नेमके?

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी सुरेखा दळवी यांनी सकाळी स्वतः च्या शेतातील गट नं. 18 मध्ये विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारारम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरेखा यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने दळवी कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. या धक्क्यातून दळवी कुटुंब सावरत नाही तर बुधवारी सकाळी संतोष दळवी यांनी शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने संतोष यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना त्या ठिकाणी मृत घोषित केले. (Aurangabad Crime News)

दळवी यांच्या कुटुंबावर बँकेचे आणि बचत गटाचे कर्ज होते.
दरम्यान आपल्या तीन एकर शेतातून होणाऱ्या पिकातून कर्ज फेडण्याचे त्यांनी निश्चय केला होता.
मात्र सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे या विंवचनेत पती- पत्नी होते. पैशांची कोणतीच सोय होत नसल्याने या दोघा पती- पत्नींनी आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत सुरेखा आणि संतोष दळवी यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे तर एका मुलीचे लग्न झाले आहे.

Web Title :- Aurangabad Crime News | farmer husband and wife suicide due to financial crisis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसब्यात हेमंत रासने तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप प्रचंड बहुमतांनी जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

Thane Crime News | ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा दिली म्हणून तरुणांवर गुन्हा दाखल, ठाण्यातील घटना

Mumbai Crime News | इन्स्टा मैत्री पडली महागात ! पोलिसात नोकरी देण्याच्या आमिषाने मित्राने महिलेला 2 लाखात विकले