Aurangabad Crime | विहिरीत पडलेल्या मुलीला मयत ठरून बापानेच परस्पर पुरल्याचा संशय; औरंगाबादमधील खळबळजनक प्रकार

ADV

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   Aurangabad Crime | औरंगाबादमधील दौलताबाद येथे एक खळबळजनक घटना (Aurangabad Crime) उघडकीस आली आहे. वडिलांशी भांडण झाल्यावर 17 वर्षीय मुलगी घरातून निघून गेली. त्यांनतर काही तासामध्ये ती विहिरीत पडलेली आढळून आली. नंतर वडील आणि भाऊ तिला बाहेर काढतात, मुलगी मृत (Died) झाल्याचे ठरवत नातेवाईकांना बाजूला करुन तिला विहिरीच्या शेजारीच पुरतात. ही घटनेा 22 सप्टेंबर रोजी घडली आहे. स्वतच्या मुलीला पुरून टाकण्यासाठी बापाचा हात असल्याचा दाट संशय असल्याने खळबळ उडाली आहे. राधा जारवाल (Radha Jarwal) असं त्या मुलीचं नाव आहे.

याबाबत माहिती अशी, 22 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास पीआय राजश्री आडे (PI Rajshree Aade) यांना गावातीलच एका व्यक्तीने फोन करून या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची (Aurangabad Crime) माहिती दिली. यांनतर पोलिसांनी (Police) जारवाल परिवाराच्या (Jarwal family) घरी धाव घेतली. मात्र, कुटुंबातील कुणीही यासंबंधी बोलायला तयार नव्हते. जारवाल यांना 3 मुली आणि 2 मुले असल्याचे कळले. पण मोठी मुलगी राधा कुठे आहे, हे विचारताच कुटुंबातील सगळेच जण शांत बसले. पण, पोलिसी खाक्या दाखवताच वडिलांनी तिचा मृत्यू (Died) झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील सर्व सदस्यांची विचारपुस केली.

ADV

 

दरम्यान, राधा संध्याकाळी स्वयंपाक करत असताना वडिलांनी तिला मारले.
ती घराबाहेर पडली. मात्र खूप वेळ झाला, ती दिसत नसल्याने वडिलांनी तिची शोधाशोध सुरु केली.
अखेर शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. भाऊ आणि इतर दोघांच्या मदतीने वडिलांनी मृतदेह विहिरीबाहेर काढला. राधा मृत झाल्याचे या सर्वांनी परस्परच ठरवले.
पण घडल्या प्रकारामुळे सर्व नातेवाईक जमा झाले. राधाला खाटेवर ठेवत उरलेल्या कुटुंबियांना वडिलांनी एका खोलीत बंद केले.
त्यानंतर तिला विहिरीजवळ पुरले, अशी माहिती प्राथमिक चौकशीअंती समोर येत आहे.

दरम्यान, वडिलांनी आपला सन्मान जपण्यासाठी हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.
तर, राधाचा पुरलेला मृतदेह पोलीस बाहेर काढणार असून तो पुढे शवविच्छेदनासाठी पाठवला जाईल. याप्रकरणी अधिक तपास पोलिस (Police) करीत आहेत.

 

Web Title : Aurangabad Crime | suspected death of 17th year old girl happened in daulatabad aurangabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन

Nagpur Crime | पत्नीचं दुसर्‍याशी होतं ‘लफड’, पती ठरत होता ‘अडसर’; 3 लाखाच्या सुपारीनंतर घडलं असं काही…

LIC ने सर्व पॉलिसीधारकांसाठी जारी केली महत्वाची सूचना, तात्काळ जाणून घ्या अन्यथा…