‘मला लाड नको, मला आशीर्वाद हवा’ : CM उद्धव ठाकरे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद महापालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज (शनिवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी घरी बसून मी काय काम केले हे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मला श्रीखंड्या होण्याचे भाग्य लाभले याचा अभिमान असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मला लाड नको. मला आशीर्वाद हवा आहे. रस्त्यांची अवस्था भयाण आहे. बऱ्याच लोकांनी रस्त्यावर खड्डे पाडले आहेत. ती आता गुळगुळीत करायची आहेत. ज्यांची ओळख रिमोट कंट्रोल होती, त्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन रिमोटने केले. भूमिपूजन करुन मी थांबणार नाही. मी अचानक कामांची पाहणी करणार आहे. त्याची सुरवात नुकतेच समृध्दी महामार्गाची पाहणी केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले नाही. त्यांना मदत केली. फक्त घोषणा देत नाही आपण खात्री देतोय. औरंगाबाद येथील विमानतळाचे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ या नामकरणाचा प्रस्ताव पाठवल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आम्ही निवडणूक जिंकतो. निवडून देणाऱ्या मतदारांचे भवितव्य अंधारात ठेवायचे नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.

मला विकास कामांची घाई

मला विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगाने करायचा आहे. केवळ भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाही. काम पूर्ण करायला आलोय, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.

बाळासाहेबांचं स्मारक उभारणार

मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार असल्याचीही घोषणा केली. येत्या 2025 पर्यंत औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारलं जाईल. या स्मारकात नुसता पुतळा नसेल तर या स्मारकातून अनेकांना हिंदुत्वाची प्रेरणा मिळेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.