Aurangabad Suicide News | धक्कादायक! दोन वर्षांच्या चिमुकलीसमोरच आई-वडिलाची गळफास घेत आत्महत्या

Aurangabad Suicide News | farmer couple suicide in aurangabad hanged himself to the tree

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad Suicide News | दोन वर्षांच्या चिमुकलीसमोरच शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या (Aurangabad Suicide News) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथे घडली. गरिबीच्या नैराश्यातून या शेतकरी (Farmer) दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. राजू दामोधर खंडागळे Raju Damodhar Khandagale (वय, 28) आणि अर्चना राजू खंडागळे Archana Raju Khandagale (वय, 26) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, राजू खंडागळे यांच्याकडे वडिलोपार्जित 2 एकर शेती आहे. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. आईवडील आणि दोघा भावांच्या संसाराचा उदरनिर्वाह 2 एकर शेतीवर भागत नव्हते. त्यामुळे राजू यांनी गावातील एका शेतकऱ्याची शेती बटाईने केली होती. पण गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. अशात आर्थिक परिस्थितीमुळे संसारात ओढाताण होऊ लागली. यामुळे राजू खंडागळे नैराश्यात होते. शुक्रवारी दोघेही पती पत्नी शेतात गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत 2 वर्षांची मुलगीही होती. (Aurangabad Suicide News)

सायंकाळी 6 वाजता राजू यांच्या वडिलांनी त्यांना फोन लावून विचारणा केली असता, शेतातून निघालो असल्याचे त्यांनी सांगितले. पण खूप वेळ होऊन ही न आल्याने पुन्हा फोन लावला. मात्र, राजू फोन उचलत नसल्याने कुटुंबातील सदस्य शेतात गेले. यावेळी राजू आणि अर्चना दोघेही झाडाला गळफास घेतेलेल्या अवस्थेत आढळले.

दरम्यान, याबाबत माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर दोघांनाही बिडकीन शासकीय रुग्णालयात (Bidkin Government Hospital) दाखल केले,
मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून,
बिडकीन पोलीस ठाण्यात (Bidkin Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा दर काय? जाणून घ्या

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर