एकदिवसीय मालिका संपली, आता उद्यापासून सुरू होणार T-20, इथं पाहा सामन्याचा वेळ आणि पूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने तीन सामन्यांची वन डे मालिका गमावली असली, तरी कॅनबेरामध्ये खेळलेला शेवटचा सामना जिंकून हा सन्मान वाचवला. 50 षटकांनंतर आता क्रिकेटच्या सर्वांत रोमांचक स्वरूपाची वेळ आली आहे. या मालिकेतही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-20 सामने खेळले जातील, त्यानंतर कसोटी मालिका हाेणार आहे.

टी -20 मालिकेचे वेळापत्रक 4 डिसेंबर रोजी विराट कोहलीच्या नेतृत्वात कॅनबेरा येथे खेळविण्यात येणार आहे, तर दुसरा व तिसरा सामना 6 आणि 8 डिसेंबर रोजी सिडनी येथे होईल. विशेष म्हणजे एकदिवसीय मालिकेचे तीन सामनेही या ठिकाणी खेळले गेले होते, आता दोन शहरे टी -20 मालिकेचे आयोजन करतील. ऑस्ट्रेलियन वेळेनुसार टी -20 सामने संध्याकाळी 7:10 वाजता सुरू होतील, पण भारतीय वेळेनुसार ते दुपारी 1:40 वाजता खेळतील.

04 डिसेंबर : कॅनबेरामधील पहिला टी-20 सामना (दुपारी 1:40)

06 डिसेंबर : सिडनीमधील दुसरा टी-20 सामना (दुपारी 1:40)

08 डिसेंबर : सिडनीमधील तिसरा टी -20 सामना (दुपारी 1:40)

सर्व वेळ भारतीय वेळेनुसार

हे दोन संघ पुढीलप्रमाणे आहेत :
भारतीय टी-20 संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर आणि टी नटराजन.

ऑस्ट्रेलियन टी-20 संघ : अ‍रॉन फिंच (कर्णधार), डार्सी शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मॉजेस हेन्रिक्‌स, मार्नस लबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, जोश हेजलवुड, सीन अ‍ॅबॉट, अ‍ॅस्टन एगर, कॅमेरून ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी, मिशेल स्टार्क, अँड्र्यू टाय , मॅथ्यू वेड, अ‍ॅडम जंपा.