हृदयद्रावक ! ऑस्ट्रेलियातील 10 हजार उंटाना ‘हेलिकाॅप्टर’मधून गोळ्या घालून ‘ठार’ केलं

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियातील पाणी प्रश्नाने हिंसक रूप धारण केलं आहे. उंट जास्त पाणी पितात म्हणून तेथील 10 हजार उंटांना गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेली भीषण आग सुरूच आहे. अशात पाण्याची समस्याही गंभीर झाली आहे. ऑस्ट्रेलियातील भीषण आगीत आतापर्यंत 50 कोटींहून अधिक वन्य प्राण्यांचा बळी गेला आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, उंट मानवी वस्तीत येऊन जास्त पाणी पितात आणि पाण्याचा साठा संपवतात अशी तक्रार स्थानिकांनी केली होती. उंटाचा स्थानिक लोकांना मोठा त्रास होऊ लागला आहे अशी लोकांची तक्रार होती. यानंतर येथील प्रशासनाने या गोष्टीची दखल घेत 10 हजार उंटांना गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश दिले. यासाठी प्रशासनाने प्रोफेशनल शुटर्स बोलवले आणि ही त्यांना उंटाना ठार मारण्यास सांगितले. या शुटर्सने हेलिकॉप्टरमधून उंटाना गोळ्या घालून ठार केलं.

ADV

उंटांना ठार केल्याच्या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. प्राणीप्रेमींनी मात्र या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ऑस्ट्रेलियात प्राण्यांना वाचवण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे.

प्राणीप्रेमी असलेल्या आयर्वीन कुटुंबाने ऑस्ट्रेलियातील आगीत सापडलेल्या तब्बल 90 हजार प्राण्यांचे प्राण वाचवले आहेत. या कुटुंबाने प्राण्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. इतर नागरिकांनीही प्राण्यांना वाचवण्यासाठी जमेल तशी मदत केली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/