धक्कादायक ! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आरोन समर्सला अटक, कारर्कीद धोक्यात

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  सध्या ऑस्ट्रेलियातील क्रिकेट अन् त्यांचे खेळाडू चर्चेचा विषय ठरत आहेत. लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आरोन समर्सला अटक झाली होती. त्याला सोमवारी डार्विन कोर्टात हजर करण्यात आले. समर्सच्या मोबाइल फोनमध्ये लहान मुलांचे शोषण केल्याचे व्हिडिओ आहेत. पोलीसांनी क्रिकेटपटूच्या या कृत्याचा तीव्र निषेध करत त्याच्या वागण्याला घृणास्पद असे वर्णन केले आहे. इतक्या गंभीर आरोपामुळे समर्सची क्रिकेट कारकीर्द संकटात सापडली आहे.

समर्स हा वेगवान गोलंदाज असून तस्मानियासाठी 3 सामने खेळला आहे. बिग बॅश लीगमध्ये त्याने होबार्ट हरिकेन्सचेही प्रतिनिधित्व केले होते.

नॉर्दर्न टेरिटरीज पोलिसांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकानुसार, समर्स असे बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी अनेक मुलांशी संपर्क साधत होता. समर्सच्या मोबाइलमध्ये अत्याचाराचे अनेक व्हिडिओ आहेत. आणखी असे अश्लील फोटो घेण्यासाठी समर्स 10 मुलांशी संपर्कात असल्याचा पुरावाही सापडला आहे. समर्स यावर्षी अबुधाबी येथे टी-10 लीगमध्ये खेळला होता. जिथे त्याने डेक्कन ग्लॅडिएटर्सचे प्रतिनिधित्व केले होते. या गंभीर आरोपामुळे समर्सची क्रिकेट कारकीर्द संकटात सापडली आहे.