Coronavirus : वैज्ञानिकांचा मोठा दावा ! कोरोनाच्या युध्दात विकसित केलं तंत्रज्ञान, व्हायरसला 99 टक्क्यांपर्यंत करू शकतं नष्ट, जाणून घ्या

सिडनी : वृत्तसंस्था –  कोरोना महामारीच्या प्रकोपादरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी एक अशी थेरेपी विकसित केली आहे, जी 99.9% कोविड-19 पार्टिकल्सला मारण्यास सक्षम आहे. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की हे संशोधन कोरोनाच्या विरूद्धच्या लढाईत परिणामकारक ठरू शकते. ऑस्ट्रेलियाच्या मेन्जीस हेल्थ इन्स्टीट्यूट क्विन्सलँडच्या अंतरराष्ट्रीय शस्त्रज्ञांच्या टीमने ही थेरेपी विकसित केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हे तंत्रज्ञान एखाद्या मिसाईलप्रमाणे काम करते, जे अगोदर आपले टार्गेटला डिटेक्ट करते आणि नंतर त्यास नष्ट करते.

कमी होऊ शकतो डेथरेट

‘डेली मेल’च्या रिपोर्टनुसार, ही नेक्स्ट-जनरेशन टेक्नोलॉजी एका ‘हीट-सीकिंग मिसाईल’ प्रमाणे काम करते. ती अगोदर कोविड पार्टिकल्स ओळखते आणि यानंतर त्यांच्यावर हल्लाबोल करते. संशोधनात सहभागी प्रोफेसर निगेल मॅकमिलन यांनी म्हटले की, ही अभूतपूर्व ट्रीटमेंट व्हायरसला प्रतिकृती बनवण्यापासून म्हणजेच संख्या वाढवण्यापासून रोखते आणि याच्या मदतीने कोरोना व्हायरसने होणारे मृत्यू कमी करता येऊ शकतात.

जीन-सायलेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारित

प्रोफेसर मॅकमिलन यांनी म्हटले की, हे एक शोधा आणि नष्ट करा मिशन आहे. आपण या थेरेपीच्या मदतीने एखाद्या व्यक्तीच्या फु फ्फुसातील व्हायरसला डिटेक्ट करून त्यास नष्ट करू शकतो. मॅकमिलन यांच्यानुसार, ही थेरेपी जीन-सायलेन्सिंग नावाच्या वैद्यकीय तंत्रज्ञानावर आधारित आहे, जी पहिल्यांदा 1990 च्या दशकात ऑस्ट्रेलियामध्ये शोधण्यात आली होती. श्वसन रोगावर हल्ला करण्यासाठी जीन-सायलेन्सिंग आरएनएचा उपयोग करते – डीएनएच्या समान शरीरात फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक्स.

जीनोमला करते प्रभावित

प्रोफेसर म्हणाले, हे एक असे तंत्रज्ञान आहे जे आरएनएच्या छोट्या तुकड्यांसह काम करते, जे विशेषकरून व्हायरसच्या जीनोमसोबत जोडले जाते. हेच बायंडिंग जीनोमला पुढे काम करू देत नाही आणि अखेर त्यास नष्ट करते. मात्र, जेनमविर आणि रेमडेसिविर सारखे इतर अँटी वायरल उपचार आहेत, जे कोरोनाची लक्षणे कमी करतात आणि रूग्णांना लवकर बरे होण्यास मदत करते. परंतु ही ट्रीटमेंट थेट कोरोना व्हायरसला नष्ट करण्याचे काम करते.