राज्यातील ऑटोरिक्षा चालक-मालक ९ जुुलैपासून विविध मागण्यांसाठी संपावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ऑटोरिक्षा चालक-मालक दि. 9 जुलै (मंगळवार) पासून विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहे. ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेच्या संयुक्‍त कृती समितीने हा संपाचा निर्णय घेतला असून 9 जुलैला राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. उबेर, ओला, बेकायदेशीर टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यात याव्यात अशी मागणी ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेने केली आहे. तसेच हकीम समितीच्या शिफारशी लवकरात लवकर म्हणजेच तात्काळ सुरू करण्यात याव्यात तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातील 18 लाख तर मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील असे एकुण 2 लाख 50 हजार हून अधिक रिक्षा चालक-मालक संपावर जाणार आहे. रिक्षाचा संप असल्याने त्याचा सर्वसामान्यांच्या जनजीवनावर परिणाम होणार आहे. पुणे,मुंबई, नागपूर, पश्‍चिम महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी या संपाचा मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे.

ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेच्या ‘या’ आहेत प्रमुख मागण्या

1. ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनासाठी राज्य सरकारने केलेलं कल्याणकारी महामंडळ हे परिवहन खात्यातंर्गत असावे.
2. विमा कंपनीकडे भरण्यात येणारे पैसे हे विमा कंपनीत न भरता महामंडळात भरण्यासाठी परवानगी अथवा पैसे तेथे भरण्यात यावेत.
3. राज्यात बेकायदेशीररित्या होणारी वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक शहरात आणि जिल्हयात भरारी पथक असावी.
4. ऑटोरिक्षाचे भाडे हकीम कमिटीच्या शिफारशीनुसार वाढवण्यात यावे.
5. ओला, उबेर आणि इतर बेकायदेशीररित्या चालणार्‍या टॅक्सी कंपन्यांच्या सेवेवर तात्काळ बंदी घालावी.
6. राज्यातील ऑटोरिक्षाच्या विम्यामध्ये होणार मोठी वाढ त्वरीत कमी करण्यात यावी.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी