‘या’ मागण्या मान्य न झाल्यास ऑटोरिक्षा चालक मालक जाणार संपावर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऑटोरिक्षांच्या बाबतीत असणाऱ्या अनेक समस्यांबद्दल मागील अनेक दिवसांपासून रिक्षाचालक नाराजी व्यक्त करत होते. अखेर या नाराजीचे पर्यावसान कृतीत झाले असून आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य चालक मालक संघटनेच्या संयुक्त कृती समितीने दिला आहे.

मागील अनेक दिवसांपासून ऑटोरिक्षा चालक आणि मालकांच्या संबंधित अनेक समस्या प्रलंबित आहेत. या सर्व समस्यांबद्दल सविस्तर चर्चा आज पार पडलेल्या बैठकीत झाली. या मागण्या प्राधान्याने आणि तातडीने सोडविण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनदेखील देण्यात येणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. यानंतरही या मागण्या ३० जूनपर्यंत मान्य न झाल्यास मात्र ९ जुलैपासून रिक्षाचालक आणि मालक बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा यावेळी सरकारला देण्यात आला.

काय आहेत रिक्षाचालक मालक संघटनेच्या मागण्या ?
१. विम्याचे पैसे विमा कंपनीत न भरता महामंडळात भरण्यात यावे.
२. ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून हे या मंडळाने परिवहन खात्याअंतर्गत काम करावे.
३. ऑटोरिक्षा विम्यात होणारी भरमसाठ वाढ तात्काळ कमी करावी.
४. हकीम कमिटीने केलेल्या शिफारशीनुसार ऑटोरिक्षाची भाडेवाढ करावी.
५. ओला, उबेर सारख्या टॅक्सी कम्पन्यांच्या सेवेवर बंदी घालावी.
६. प्रत्येक जिल्यात भरारी पथक असावं जे अवैध वाहतूक थांबविण्यासाठी काम करेल.

आरोग्य विषयक वृत्त –

दिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’ होतील दुष्परिणाम
राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय ; जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही
मेंदू सदैव सक्रीय ठेवण्यासाठी ‘या’ ५ सवयी आवश्यक