Avadhoot Gupte | अवधूत गुप्ते भाजपच्या विद्यमान मंत्र्यावर चित्रपट काढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Avadhoot Gupte | भाजपमधील (BJP) एका आमदारावर आणि विद्यमान मंत्र्यावर चित्रपट काढण्याची गायक, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शत अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) यांची इच्छा आहे. त्यांनी त्यासाठी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची निवड केली आहे. त्यामुळे आगामी काळात गिरीश महाजन यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

मी झेंडा चित्रपटात एका प्रामाणिक कार्यकर्त्याची व्यथा मांडली होती. आता मला भाजपच्या एका प्रामाणिक कार्यकर्ता ते मंत्री झालेल्या व्यक्तीची व्यथा मांडायची आहे, असे अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) म्हणाले. ग्रामविकास आणि वैदकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या आयुष्यात भाजपचा एकमेव झेंडा खांद्यावर घेतला आणि ती सलग 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले. सध्याच्या राजकारणात ते शक्य नाही. त्यांच्यावर चित्रपट काढावा, असे मला वाटत असल्याचे गुप्ते म्हणाले.

दिवाळी निमित्त गिरीश महाजन फाऊंडेशेनच्या (Girish Mahajan Foundation) वतीने स्वर संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अवधूत गुप्ते बोलत होते.
यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर एक गाणे देखील सादर केले.
या कार्यक्रमात गुप्तेंनी गिरीश महाजन यांच्यासोबत संवाद साधला.
त्यांनी त्यांना राज्यातील सत्तांतरात तुमचा हात होता का, असा प्रश्न विचारला.
त्यावर महाजन म्हणाले, माझा त्यात खारीचा वाटा होता. यावेळी महाजनांनी इतर विषयांवर देखील भाष्य केले.
महाजन म्हणाले, मी माझ्या कामामुळे ट्रबल शूटर म्हंटला जातो.
मला जामनेरला राज्यातील क्रमांक एकचे शहर बनवायचे आहे.
अनिल अंबाणींनी मला 25 कोटी देण्याचे सांगितले आहे. ते म्हणाले हे पैसे घ्या आणि जामनेरला चांगले क्रीडा संकूल तयार करा. त्यामुळे वर्षभरात जामनेरला अद्ययावत क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात येईल.

Web Title :-  Avadhoot Gupte | devendra fadnaviss loyal minister girish mahajan movie soon announcement of avadhoot gupte

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Big Boss | सलमान खान कतरिना कैफच्या तालावर नाचला, काय आहे नेमके प्रकरण?

Gulabrao Patil | कोणीही बिकाऊ नाही, राणांनी आपले शब्द मागे घेतले पाहिजेत – गुलाबराव पाटील

Bachchu Kadu | बच्चू कडूंचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘खोकेवाले आमदार म्हणतात हे दु:ख, काही आमदारांनी मला फोन करून…’