Avatar 2 | ‘अवतार 2’ चित्रपटाने ‘टायटॅनिक’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्ड तोडला; अवतारचा पुढील भाग होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

पोलीसनामा ऑनलाइन टीम : नुकताच ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ (Avatar 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरात या चित्रपटाची चर्चा होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच नवनवीन विक्रम करताना दिसून आला. आता या (Avatar 2) सिनेमाने ‘टायटॅनिक’ या ब्लॉकबस्टर सिनेमाचाही रेकॉर्ड तोडला आहे.

आजवर ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या सिनेमाने जगभरात 2.2448 बिलियन डॉलर्स एवढी कमाई केली आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार या सिनेमाने जगभरात 1,85,92,44,37,600 रुपयांचा गल्ला जमवला आहे. आता टायटॅनिक या ब्लॉकबस्टर सिनेमाचा रेकॉर्ड देखील या चित्रपटाने मोडला आहे. जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये ‘अवतार’, ‘अवतार 2’ आणि ‘टायटॅनिक’ या चित्रपटांचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा जेम्स कॅम्रोनने सांभाळली आहे. अवतार 2 या चित्रपटाने टायटॅनिक या चित्रपटाचा रेकॉर्ड जरी मोडला असला तरी अद्याप या चित्रपटाला मार्वल स्टुडिओजच्या ‘एवेंडर्स एंडगेम’ या सिनेमाला मागे टाकता आले नाही.

तर आता अवतार चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
अवतार २ (Avatar 2) हा सिनेमा 16 डिसेंबर 2012 रोजी प्रदर्शित झाला होता.
आता या सिनेमाचा पुढील भाग म्हणजेच अवतार 3 हा सिनेमा 20 डिसेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एवढेच नाही तर आता या सिनेमाचे आणखीन तीन भाग प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहेत.
त्यातील ‘अवतार 3’ हा सिनेमा 20 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
तर ‘अवतार 4’ हा चित्रपट 8 डिसेंबर 2026 आणि
‘अवतार 5’ हा सिनेमा 22 डिसेंबर 2028 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या अवतार 2 नंतर प्रेक्षकांना अवतारच्या पुढच्या भागाची उत्सुकता लागली आहे.

Web Title :-  Avatar 2 | avatar 2 beats titanic james cameron avatar the way of water box office collection

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

WPL Title Sponsor | IPL पाठोपाठ WPLला मिळाला ‘हा’ टायटल स्पॉन्सर; बीसीआयसोबत केला 5 वर्षांचा करार

Solapur Crime News | धक्कादायक! सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या

MC Stan | रॅपर एमसी स्टॅन बॉलिवूड मध्ये येण्यासाठी सज्ज; साजिद-वाजिदकडून मिळाली ‘ही’ खास ऑफर