सायबर सुरक्षेविषयी जागृती म्हणजे संगणक साक्षरता : अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – समाजातील सर्व घटकांनी सायबर सुरक्षा समजून घ्यायला हवी, मोबाईल व इंटरनेटचे गुलाम न होता त्याचा आवश्यक तेवढाच वापर करायला हवा. सायबरविषयी जागृती म्हणजेच खरी संगणक साक्षरता, असे मत अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी व्यक्त केले.
वुमन डॉक्टर विंग आणि उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा या विषयाबाबत जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी वुमन डॉक्टर विंगच्या अध्यक्ष डॉ. मीना जिंतुरकर, सचिव डॉ.कौशाली राजगुरू, कार्यकारी अभियंता अनिल सगर, लीड बँक मॅनेजर निलेश विजयकर, कार्यकारी अभियंता श्री. कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, उपशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, पोलीस उपनिरीक्षक, सायबर सेल क्रांती ढाकणे, महिला तक्रार निवारण केंद्र प्रमुख माया पानसे, डॉ. चंचला बोडके, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन देशमुख, सचिव डॉ. मिलिंद पोळ, डॉ. राजगुरू,डॉ.मुळे,डायटचे प्राचार्य डॉ. इब्राहीम नदाफ, सायबर सुरक्षा इंटरनेटचा वापर थोडा सबुरीनं..थोडा सावधातेनं.. या पुस्तकाचे संकलक/संशोधक तानाजी खंडागळे, दैनिक संघर्ष समाजवादाचाचे संपादक संतोष हंबीरे, औरंगाबाद विद्यापीठाचे प्रा. वरूण कळसे, सखी वन स्टॉप सेंटर च्या केंद्रप्रमुख वासंती मुळे, माजी महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, वुमन डॉक्टर विंगच्या व इंडियन मेडिकल असोसिएशनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पालवे म्हणाले की, मी व माझा हँडसेट असे आभासी जीवन जगणारी पिढी झपाट्याने वाढत आहे. पूर्वी इंटरनेटची सेवा प्रमुख शासकीय कार्यालयापुरतीच मर्यादित होती. परंतु, काही वर्षात इंटरनेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्याचे फायदे तसेच तोटेही आहेत. आता सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रत्येकाने इंटरनेटचा वापर आवश्यक तेवढाच केला पाहिजे.

किंमती वस्तूंपेक्षाही मोबाईलला अधिक महत्त्व आले आहे. तो जीवनातील एक अविभाज्य घटक बनला असे, यावेळी पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या प्रत्येकानं सोशल मिडीयाचा जपून वापर करावा, आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी.

उपस्थितांशी संवाद साधताना महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख माया पानसे म्हणाल्या, महिलांचे सबलीकरण कायद्याने झाले परंतु मनाने नाही. त्यामुळे महिलांनी आपलं वर्चस्व निर्माण करून सन्मानाने जीवन जगायला शिकले पाहिजे.

प्रमुख मार्गदर्शन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, प्राचार्य, महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था,पुणे विकास गरड, माहिती व जनसंपर्क विभाग औरंगाबाद विभागाचे संचालक गणेश रामदासी, लातूर विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे, डायटचे प्राचार्य डॉ. इब्राहीम नदाफ,शिक्षणाधिकारी गजानन सुसर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील आयटी विभाग प्रमुख डॉ.प्रभाकर बुधाराम यांनी केले आहे.