साबळे फार्मसी महाविद्यालयामार्फत सासवड शहरात डेंग्यूबाबत जनजागृती

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्र महाविद्यालयामार्फत व ग्रामीण रुग्णालय आणि सासवड नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सासवड शहरामध्ये डेंगू या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जनजागृती करण्यासाठी सासवड शहरामध्ये घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांनी नागरिकांना डेंग्यू या आजाराबाबत माहिती दिली.

या उपक्रमाचे उदघाटन सासवड नगरपालिकेचे नगरसेवक दिपकनाना टकले यांनी केले. यावेळी त्यांनी सासवड शहराला डेंगू या आजाराने थैमान घातले असून दिवसेनदिवस या आजाराचे प्रमाण वाढत आहे. सदरचा आजार डासांपासून होत असून नागरिकांना याबाबत जागृत करणे आवश्यक असल्याचे उदघाटन प्रसंगी सांगितले. त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.वाय.पाटील व या जनजागृतीचे नियोजन करणारे प्रा. निलेश भोसले व प्रा.सागर भिसे यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.वाय.पाटील यांनी आपल्या मनोगमध्ये महाविद्यालयातील विद्याथी हे नेहमीच समाजसेवेमद्ये तापरतेने व उत्साहाने भाग घेत असतात.

या मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम, वारी मध्ये सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांना मदत करणे व रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणे अशा विविध सामाजिक उपक्रमामध्ये उसूक्तेने सहभागी असतात. सदरच्या उपक्रमांमद्ये महाविद्यालयातील १५० विद्याथ्यांनी सहभाग घेतला. विद्याथ्यांनी घराघरात जाऊन घरामद्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्या व घराच्या छतावर असणारे टाकाऊ वस्तू मधील साठलेले पाणी टाकून देऊन सदरच्या डेंगू होणाऱ्या अळ्या व डास याबाबत नागरिकांना मार्ग्दर्शन केले.

या उपक्रमाबाबत सासवड नगर पालिकेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी विद्यर्थ्यानी केलेल्या नेत्रदीपक उपक्रमाबाबत विद्यार्थ्याचे व महाविद्यालयातील शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी मार्गदर्शन केले व या उपक्रमाबाबत विद्यार्थ्याचे कौतुक केले. या उपक्रमासाठी सासवड नगरपालिकेचेआरोग्य अधिकारी मोहन चव्हाण ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. चौरे यांनी विशेष सहकार्य केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा.वैभव शिळीमकर व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.अमोल काळे, प्रा. निलेश भोसले व प्रा.सागर भिसे यांनी केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –