अयोध्याच्या आधी पश्‍चिम बंगालमध्ये तयार होणार राम मंदिर,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करणार भुमिपूजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्यामध्ये राममंदिर उभे राहील कि नाही हे न्यायालय ठरवेलच मात्र त्याआधी पश्चिम बंगालमध्ये राम मंदीर उभारणीचे कार्य सुरु करण्यात येणार आहे. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भूमिपूजन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय राम मंदिर ट्रस्टने याविषयीची घोषणा केली आहे. १५ सप्टेंबर रोजी योगी आदित्यनाथ राममंदिराचे भूमिपूजन करतील.पश्चिम बंगालमधील हावडामध्ये हे राममंदिर उभे राहणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये  भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाद पाहायला मिळाला होता. त्याचबरोबर पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील राममंदिराचा मुद्दा महत्वाचा असल्याने पुन्हा एकदा या दोन पक्षांमधे वाद उभा राहू शकतो. त्यामुळेच अनेक राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने राम मंदिराचा मुद्दा  पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.

दरम्यान, याआधी ७ जून रोजी योगी आदित्यनाथ यांनी अयोध्यामधील कोदंड येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे अनावरण केले होते. त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांच्या २२१ मीटर उंचीच्या मूर्तीच्या उभारणीची देखील त्यांनी घोषणा केली होती. त्याचे काम देखील सध्या सुरु आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा राम मंदीराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या १८ खासदारांना घेऊन अयोध्येला देखील  जाणार आहेत.

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

 

Loading...
You might also like