10 मिनिटात 2 कोटींचे झाले 18 कोटी, राम मंदिर जमीन खरेदीत घोटाळा ? सीबीआय चौकशीची मागणी

लखनऊ : वृत्तसंस्था – अयोध्यामध्ये Ayodhya श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टद्वारे खरेदी केलेल्या जमीनीवर ram janmbhumi trust land purchase प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जमीनीच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अयोध्याचे माजी आमदार आणि सपा सरकारमधील माजी राज्यमंत्री तेज नारायण पांडे Tej Narayan Pandey उर्फ पवन पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे प्रश्न उपस्थित केले आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

त्यांनी आरोप केला की, 2 कोटीत जमीनीचा व्यवहार झाला आणि त्याच दिवशी पुन्हा साडे 18 कोटीत अ‍ॅग्रीमेंट Agreement झाले. अ‍ॅग्रीमेंट आणि संमती दोन्हीवर ट्रस्टी अनिल मिश्रा Anil Mishra आणि मेयर ऋषिकेष उपाध्याय साक्षीदार आहेत. 18 मार्च 2021 लाच सुमारे 10 मिनिटे अगोदर संमती झाली आणि नंतर अ‍ॅग्रीमेंट सुद्धा, जी जमीन दोन कोटीत खरेदी केली गेली त्याच जमीनीचे 10 मिनिटानंतर साडे 18 कोटीत अ‍ॅग्रीमेंट झाले?

सीबीआय चौकशीची मागणी
पवन पांडेय यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, काही मिनिटातच 2 कोटी किमतीची जमीन साडे 18 कोटी कशी झाली? राम मंदिराच्या नावावर जमीन खरेदी ram janmbhumi trust land purchase करण्याच्या बहाण्याने राम भक्तांची फसवणूक केली जात आहे. त्यांनी हा सुद्धा दावा केला आहे की, जमीन खरेदीचा सर्व खेळ मेयर आणि ट्रस्टी यांना माहित होता. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय CBI चौकशी झाली पाहिजे.

प्रभु श्री रामाच्या नावावर जमीन खरेदीत भ्रष्टचार
पवन पांडे यांचा दावा आहे की, 17 कोटी आरटीजीएस करण्यात आले, कोण-कोणत्या खात्यातून पेमेंट झाले त्याचीही चौकशी झाली पाहिजे.
प्रभु श्री रामाच्या नावावर जमीन खरेदीत भ्रष्टचार होत आहे. 12080 वर्ग मीटर म्हणजे 1.208 हेक्टर जमीनीचा करार झाला आणि अ‍ॅग्रीमेंट झाले.
बाबा हरिदास यांनी सुल्तान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांना विकली आणि तिच ट्रस्टने नंतर खरेदी केली. 10 मिनिटात जमीनीची किंमत 16 कोटींनी वाढली.

आम आदमी पार्टीने सुद्धा केले आरोप
आम आदमी पार्टीने सुद्धा या प्रकरणात आरोप केले आहेत.
पार्टीचे म्हणणे आहे की, 2 कोटीला खरेदी केलेली जमीन काही मिनिटानंतर राम जन्मभूमी ट्रस्टला 18.5 कोटीत विक्रीसाठी अ‍ॅग्रीमेंट करण्यात आले.

दान केलेले 16 कोटी हडपले
ट्रस्टने रजिस्टर्ड अ‍ॅग्रीमेंट करून 16.5 कोटी दिल्याचा दावा केला आहे.
आप नेते संजय सिंह यांनी म्हटले की, 2 कोटीची जमीन खरेदी केली आणि 18 कोटीचे अ‍ॅग्रीमेंट, दोन्हीमध्ये राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा साक्षीदार आहेत.
त्यांचे म्हणणे आहे की, अशाप्रकारची हेराफेरी करून दान केलेल्या पैशातील 16 कोटी रूपये हडपले आहेत.
त्यांनी म्हटले की, हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण आहे.
तात्काळ या प्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून ED कारवाई केली पाहिजे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : ayodhya ram janmbhumi trust land purchase issue pawan pandey alleged corruption in buying the land

हे देखील वाचा

आशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली – ‘लवकर लग्न करून सेटल व्हायचय; पण…’

पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

Pune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं पुण्यात मोठं विधान

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा