पचनसंस्था सुधारण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

पोलिसनामा ऑनलाईन टीम- पचनसंस्था बिघडल्याच्या तक्रारी नेहमीच ऐकू येतात. आयुर्वेदामध्ये पचनसंस्था कार्यक्षम राहण्यासाठीच्या अतिशय साधे आणि सोपे उपाय सांगितले गेले आहेत. पचनक्रिया आणि भुकेशी संबधित समस्या दूर करण्यासाठी आज आपण काही घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.

पचनसंस्था कार्यक्षम ठेवण्यासाठी जेवणात पातळ अन्नपदार्थांचा समावेश करा. यामुळे जेवण लवकर पचते. जेवणानंतर एक चमचा हिंग्वाष्टक चूर्ण खावे. यामुळे पचनक्रिया सुधारते. एक ग्लासभर ताकाचे सेवन केल्यास पचनशक्ती वाढते. जेवल्यानंतर काही काळ वज्रासनात बसावे. जेवल्यानंतर करता येणारे हे एकमेव आसन आहे. जेवणापूर्वी एक तास पंचसकार चूर्ण गरम पाण्यासोबत घ्या. याने भूक चांगली लागते. रात्री ३ भाग आवळा, २ भाग हरड व १ भाग बेहडा चूर्ण गरम पाण्यासोबत घेतल्यास जठराग्नी प्रदीप्त होतो.