Ayurvedic Herbs | पावसाळ्यातील आजारांपासून दूर रहाण्यासाठी आहारात समाविष्ठ करा ‘या’ 5 शक्तिशाली आयुर्वेदिक वनस्पती

नवी दिल्ली : Ayurvedic Herbs | सर्वांनाच पावसाळा आवडतो. हा ऋतू अनेक चिंतांपासून दूर नेतो. आवडत्या खाण्यापिण्याचा आनंद घेण्याची संधी देतो. मात्र, आरोग्याच्या दृष्टिकोनातून मान्सून हा आदर्श हंगाम नाही. (Ayurvedic Herbs)

 

पावसाळ्यात अन्न आणि डासांमुळे होणारे रोग, हंगामी संसर्ग आणि ताप यांचा आरोग्यावर परिणाम होतो. आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनही, मान्सून दोष असंतुलनाचे कारण ठरू शकतो. ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदानुसार काही औषधी वनस्पती आणि मसाले या दोषांचे असंतुलन दूर करण्यात आणि इम्युनिटी मजबूत करण्यात मदत करतात. (Ayurvedic Herbs)

 

अश्वगंधा :

अश्वगंधामध्ये इम्युन-मॉड्युलेटिंग गुणधर्म असतात, जे इम्युनिटी मजबूत करण्यास मदत करतात. सप्लीमेंट स्वरूपात अश्वगंधाचे सेवन केल्याने पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. इम्युनिटीसह, ही जादुई औषधी वनस्पती मन शांत करते, जळजळ कमी करते आणि ब्लड प्रेशरसाठी आश्चर्यकारक काम करते.

 

कडुलिंब :

कडू चवीमुळे, लोक दैनंदिन जीवनात याचा समावेश करत नाहीत. परंतु ही औषधी वनस्पती पावसाळ्यात लाभदायक आहे. कडुलिंब मायक्रोबियल संसर्गापासून बचाव करतो, त्वचेची काळजी घेतो. कडुलिंबात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. कडुलिंबाचा चहा पिल्याने किंवा कडुलिंबाची पाने चघळल्याने आरोग्य चांगले राहते.

 

गवती चहा :

गवती चहामध्ये सिट्रलसारखे कंपाउंट असते, जे प्रतिजैविक आणि रोगप्रतिकारक-उत्तेजक गुणधर्म प्रदर्शित करतात. गवती चहाचे सेवन करणे किंवा आहारात समावेश केल्याने इम्युनिटी मजबूत होते. पावसाळ्यात सामान्य आजारांपासून संरक्षण होते.

 

गुळवेल :

गुळवेल ही एक ज्वरनाशक औषधी वनस्पती आहे जी संक्रमणांशी लढण्यासाठी, इम्युनिटी बुस्ट करण्यासाठी मदत करते. गुळवेलीतील ज्वरनाशक गुणधर्म ताप आणि फ्लू सारखी लक्षणे व्यवस्थापित करतो. गुळवेलीचा काढा किंवा पावडर स्वरूपात सेवन केल्याने पावसाळ्यात इम्युनिटी मजबूत होते.

 

आले :

आल्यामध्ये सूज-विरोधी, अँटीव्हायरल, अँटी-ट्यूमर, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
आल्याचा चहा प्यायल्याने पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते.

 

Web Title :  Ayurvedic Herbs | include-5-powerful-ayurvedic-herbs-in-your-diet-to-stay-away-from-viral-
infection-and-diseases-this-monsoon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा