आगामी चित्रपटात आयुष्मान खुराणा दिसणार पोलिसाच्या भूमिकेत 

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेता आयुष्मान खुराणाने २०१८ मध्ये ‘अंधाधून’ आणि हो साबधाई रखे सुपरहिट चित्रपट दिले त्याच्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळाले. आता पुन्हा आयुष्मान सुपरहिट चित्रपट देण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या आगामी चित्रपटात तो पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाचे शूटिंग कानपूर येथे करण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित असणार आहे.

परंतु याबाबत बोलताना आयुष्मान म्हणाला की, अद्याप याबाबत अनेक गोष्टींची चर्चा करणे बाकी आहे. आजून  बरेचसे निर्णय घ्यावे लागणार आहेत. जेव्हा हे निर्णय घेण्यात येतील तेव्हाच चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

अक्षय कुमार, आमिर खान, अजय देवगन आणि सलमान खान  या सारख्या कलाकारांनी पोलिसांची भूमिका साकारली आहे परंतु आयुष्मान पहिल्यांदाच पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे त्याची ही भूमिका प्रेक्षकांना  किती आवडते हे पाहणे नक्कीच रंजक ठरेल.