आयुष्मानला ‘गे’ भूमिकेत पाहिल्यावर मुलाची धक्कादायक प्रतिक्रिया, पत्नीनं केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये कमी काळात आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याचा आगामी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात आयुष्मान एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात आयुष्मानने पहिल्यांदाच ‘गे’ तरुणाची भूमिका साकारली आहे. पण अशा भूमिकेत त्याला आयुष्मान खुरानाच्या मुलाने पाहिल्यावर त्याची प्रतिक्रिया काय होती याचा खुलासा त्याची पत्नी ताहिरा कश्यपने केला आहे.

View this post on Instagram

Happy bday jaan!

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

ऑफिशल ट्विटरवरुन ताहिराने खुलासा केला की, वडिलांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर पाहून मी आमच्या 8 वर्षाच्या मुलाला विचारले की, ‘तुला होमोसेक्शुअलिटी किंवा ‘गे’चा अर्थ माहित आहे का ? ‘ यावर तो म्हणाला की, ‘हो’. मी पुन्हा विचारले की ‘तुला याबद्दल काही समस्या आहे का ?’ यावर त्याने उत्तर दिले की, ‘यामध्ये कोणतीही समस्या असण्याचे कारण काय ?’ ताहिरा म्हणाली की, ‘त्याचे उत्तर ऐकल्यावर माझ्या डोळ्यात पाणीच आलं.’

काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये आयुष्मानला प्रश्न विचारला की, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर त्याच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया काय होती. आयुष्मान म्हणाला की, ‘त्यांना माझ्या चित्रपटाचा ट्रेलर खूप आवडला होता. दोघांनी ट्रेलर पाहिला. जेव्हा मी माझ्या कुटुंबाला चित्रपटाचा ट्रेलर एन्जॉय करताना पाहिले तेव्हा मला विश्वास बसला की, आमच्या टीमची मेहनत वाया गेली नाही. सर्व प्रेक्षक या चित्रपटाशी फक्त कनेक्टच होणार नाही तर त्यांच्यात हा नवा विचार रुजण्यासही मदत होईल. माझ्या आई-वडिलांनी मला सांगितले की, त्यांना माझ्या अभिमान वाटतो. कारण मी एका सामाजिक विषयावर चित्रपट तयार करत आहे.’

या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत जितेंद्र कुमार सुद्धा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात जितेंद्र सुद्धा ‘गे’ भूमिकेत आहे. या व्यतिरिक्त चित्रपटात नीना गुप्ता आणि गजराज यांच्याही महत्वाच्या भूमिका आहे. हितेश यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like