कंगनाच्या सिनेमाला ‘फ्लॉप’ म्हटल्यानंतर ‘बागी 3’च्या डायरेक्टरनं मागिती माफी, रंगोलीनं केला ‘पलटवार’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – डायरेक्टर अहमद खाननं कंगना रणौतचा सिनेमा मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसीला फ्लॉप म्हटलं होतं. यानंतर आता त्यानं कंगनाचं कौतुक केलं आहे. त्यानं एका मुलाखतीत म्हटलं होतं की, मणिकर्णिका मोठ्या स्केलवर बनवण्यात आला होता. परंतु पैसे बुडाले. निमार्त्यांचं नुकसान झालं. आता मात्र एका मुलाखीतत बोलताना त्यानं कंगनाला बॉलिवूडचा हिरो म्हटलं आहे. कंगनासोबत सिनेमा बनवण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे.

‘कंगना एक फीमेल बागी आहे’

आता अहमद खान म्हणाला आहे की, “कंगना एक फीमेल बागी आहे. बॉलिवूडची हिरो आणि एकटी अशी मुलगी आहे जी अ‍ॅक्शन सिनेमे करू शकते. मला खरंच धाकडचा टीजर आवडला. टीजर पाहून अंगावर काटा आला. ती एक प्रतिभावान आणि पावरफुल अ‍ॅक्टर आहे. जर तिला माझी स्क्रिप्ट आवडली तर मला सोबत काम करायला आवडेल.”

https://twitter.com/Rangoli_A/status/1237755784663986178

रंगोलीनं दिली प्रतिक्रिया

अहमद खानच्या वक्तव्यावर कंगनाची बहिण रंगोली चंदेलची प्रतिक्रिया आली आहे. रंगोलीनं ट्विट करत त्याच्यावर टीका केली आहे. रंगोली म्हणाली, “एक अयशस्वी फिल्ममेकर ज्यानं एक चांगला सिनेमा बनवला नाही. तो मणिकर्णिकावर एवढा का जळतो. हा तो सिनेमा आहे ज्यानं जपानमध्ये सारे रेकॉर्ड तोडले. भारतातही हिट झाला. स्वत:ला सिनेमा बनवायला येत नाही.” आणखी एका ट्विटमध्ये तिनं असंही सांगितलं की अहमद खाननं कंगनाची माफी मागितली आहे.

https://twitter.com/Rangoli_A/status/1237769045979672577

https://twitter.com/Rangoli_A/status/1237679535581097986