Babanrao Gholap | उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का ! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक : Babanrao Gholap | शिवसेनेचे उपनेते व गेली २५ वर्षे आमदार राहिलेले बबनराव तथा नाना घोलप यांनी आज आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. गेले अनेक दिवस घोलप शिवसेनेचा (Shivsena) राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. आपण कोणत्या पक्षात जाणार हे त्यांनी अद्याप जाहीर केले नाही.

याबाबत बबनराव घोलप म्हणाले, आजवर शिवसैनिक म्हणून मी निष्ठेने व इमाने इतबारे काम केले आहे. पक्षाने जी जबाबदारी सोपविली, ती प्रामाणिकपणे पार पाडली आहे. असे असताना अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदावरुन काढून अपमानीत करण्यात आले. जे निष्क्रीय होते म्हणून मी त्यांना काढून टाकले होते. नवीन पदाधिकारी नेमले होते. त्यांनाही बदलण्यात आले. जुने पदाधिकारी कसे बिनकामाचे विकाऊ आहेत, हे संपर्क प्रमुखांनी लेखी कळवले होते. असे असतानाही त्यांना परत घेऊन पदे दिली. हे सर्व पाहून आता आपण थांबले पाहिजे, असे वाटते. म्हणून मी माझा शिवसैनिकपदाचा राजीनामा देत असल्याचे घोलप यांनी सांगितले.

युतीचे सरकार असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ज्या मंत्र्यांवर आरोप केले होते.
त्यात बबनराव घोलप यांचा समावेश होता. त्यामुळे समाजकल्याण मंत्री घोलप यांची युती सरकारमधून हकालपट्टी करण्यात आली होती.

उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याप्रकरणी घोलप यांच्यावर २००० साली गुन्हा दाखल झाला होता.
१३ वर्षांनी या खटल्यात घोलप व त्यांची पत्नी शशिकला यांना प्रत्येकी ३ वर्षे सक्तमजुरी व एक लाखांचा दंडाची शिक्षा
झाली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan | खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Sunny Vinayak Nimhan | माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सुपर सनी विक क्रिडा महोत्सवाचे आयोजन

पुणे : सहायक फौजदारासह 2 पोलिस तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

Pune PMC Property Tax | शहरातील तब्बल 19 हजार ओपन प्लॉटधारकांवर महापालिका ‘उदार’; 2000 कोटींच्या थकबाकीला ‘अभय’ देण्याच्या हालचाली