बाबरी प्रकरणाचा निकाल देईपर्यंत न्यायाधीश निवृत्‍त होणार नाहीत : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाबरी मस्जिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधीशांना एस.पी. यादव यांचा कार्यकाळ वाढवला आहे. हा कार्यकाळ तोपर्यंत वाढवण्यात येईल जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होणार नाही. न्यायालयाचे म्हणणे आहे की जो पर्यंत प्रकरणाचा निर्णय येत नाही तोपर्यंत न्यायाधीश रिटायर होणार नाहीत.

शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने सेक्शन १४२ अंतर्गत आपल्या आधिकारांचा वापर करत निर्णय घेतला आहे. या प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. पी. यादव यांच्या कार्यकाळ ३० सप्टेंबर २०१९ ला संपत होता. त्याआधी न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. याच बरोबर सर्वोच्च न्यायालयाने इलाहबाद उच्च न्यायालय आणि उत्तर प्रदेश सरकारला या प्रकरणी आदेश दिले आहेत की, येणाऱ्या ४ आठवड्यात कार्यकाळ वाढवण्यात यावा.

बाबरी मस्जिद प्रकरणी ९ महिन्यात सुनावणी पूर्ण होणार आहे. अशात सांगितले जात आहे की, या प्रकरणाची सुनवणी करणारे एस.पी. यादव तेव्हा पर्यंत न्यायाधीश राहणार आहेत. या दरम्यान कोणत्याही प्रकरणांवर हे सुनावणी करु शकणार नाहीत किंवा निर्णय घेऊ शकणार नाही. या प्रकरणात जे चार्ज शीट दाखल झाले त्यात लालकृष्ण आडवाणी, उमा भारतींशिवाय कल्याण सिंह, अशोक सिंघल,  मुरली मनोहर जोशी, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा सारख्या मोठ्या नेत्यांचे नाव यात सहभागी आहे.

या प्रकरणी केस नंबर १९८ मध्ये पोलीस आधिकारी गंगा तिवारी यांनी ८ लोकांच्या विरोधात,  ‘राम कथा कुंज सभा मंच’ने मुस्लिम समुदायच्या विरोधात धार्मिक भावना भडकवणारे भाषण देऊन बाबरी मस्जिद पाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खटला दाखल केला होता. त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम १५३ A, १५३ B, ५०५, १४७ आणि १४९ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता.

आरोग्यविषयक वृत्त