Bacchu Kadu On Amravati Lok Sabha | अमरावतीची जागा भाजपाला गेल्याने बच्चू कडू संतापले, ”…तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ”

अमरावती : Bacchu Kadu On Amravati Lok Sabha | अमरावती मतदारसंघात माझे दोन आमदार सोडून किमान एक लाख मते आहेत. खरा दावा तर आम्हीच करायला पाहिजे होता. पण आम्ही प्रामाणिकपणे काम करणे हे थोडे अंगलट येत आहे. अशा परिस्थितीत अजिबात पाठिंबा राहणार नाही. ही जी स्थिती निर्माण केलेली आहे यामध्ये मानसिकता नाहीच. वेळ आली तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ, असा थेट इशारा प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी महायुतीला (Mahayuti) दिला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.(Bacchu Kadu On Amravati Lok Sabha)

अमरावतीची जागा भाजपाकडे (BJP), तर रामटेकची (Ramtek Lok Sabha) जागा शिवसेना शिंदे गटाकडे (Shivsena Eknath Shinde) राहील. अमरावतीत बच्चू कडू किंवा अडसूळ यांचे मतभेद झाले असतील. मात्र देशात नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंतप्रधान व्हावे यासाठी बच्चू कडू, अडसूळ सगळे प्रयत्न करतील. बच्चू कडू आमच्यासोबत राहतील, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आम्ही थोडे अडचणीत येत आहोत, असे वाटायला लागले आहे.
वेळ आली तर आम्ही उमेदवार देवूच. सुरुवात त्यांनी तोडायची केली आहे तर आम्ही तोडू.
आम्हालाही त्याचे वाईट वाटत आहे.

महायुतीला इशारा देताना बच्चू कडू म्हणाले, युतीतून बाहेर जायचे नाही, अशी आमची मनातील इच्छा आहे पण
तुम्हाला ठेवायचेच नाही तर आम्ही एवढे काही गुलाम नाहीत. आम्ही एवढे लाचारही नाही, असे कडू म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sadashiv Peth Crime | एकमेकांकडे पाहून हसण्यावरून दोघांवर चाकूने वार, एम.आय.पी.टी कॉलेजमधील घटना

Baramati Lok Sabha Election 2024 | विजय शिवतारे यांचा बोलविता धनी कोण? अजित पवार समर्थक सावध

Pune Vidyapeeth Crime | राजकीय पोस्ट डिलीट केल्याच्या कारणावरुन मारहाण, पुणे विद्यापीठातील घटना

Pimpri Traffic Updates | पिंपरी : तुकाराम बीजसोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Lok Sabha | ‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’ ! मुरलीधर मोहोळांचा घरोघरी जाऊन करणार प्रचार (Video)