Baramati Lok Sabha Election 2024 | विजय शिवतारे यांचा बोलविता धनी कोण? अजित पवार समर्थक सावध

‘…भाजपच्या नेत्यांकडून कुठलीच गंभीर प्रतिक्रिया उमटत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते सावध?

बारामती : Baramati Lok Sabha Election 2024 | महायुतीतील (Mahayuti) शिवसेनेचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये वेगळी भुमिका घेतली आहे. ‘नरेंद्र मोदी’ विचारमंचच्या (Narendra Modi Vichar Manch) माध्यमातून बारामती मधून निवडणूक लढवण्याची घोषणा करतानाच प्रसंगी ‘कमळ’ हाती घेऊ अशी घोषणा केली आहे. अगोदर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाही न जुमाननारे शिवतारे यांचा बोलवता धनी कोण? अशी शंका अजित पवार (Ajit Pawar NCP) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येऊ लागल्याने महायुती मध्ये ‘अलबेल’ नाही याचे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सवतासुभा झाल्यानंतर बारामती मतदार संघामध्ये पवार कुटुंबातील खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. अशातच पुरंदर चे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. शिवतारे दीड वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले.

शिवतारे हे पुरंदर (Purandar) मध्ये सलग दोन वेळा शिवसेनेकडून आमदार राहिले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे त्यांचे प्रमुख विरोधक होते. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यमंत्री असलेल्या शिवतारे यांनी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार प्रचारादरम्यान थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर बारामतीत व्यक्तिगत टीका केली. विशेष असे की, या निवडणुकीत बारामती मध्ये तळ ठोकून असलेले तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील एवढा आक्रमक प्रचार केला न्हवता. अजित पवार यांनी याचे उट्टे सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काढले. सासवड येथील सभेत हा कसा निवडून येतो हे बघतोच, असे प्रतिआव्हान देत शिवतारे यांचा पराभव केला.(Baramati Lok Sabha Election 2024)

मागील दीड वर्षातील राजकीय घडामोडींमुळे गणितं बदलली.
शिवसेने नंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाले.
शिवतारे यांनी अजित पवार यांची सर्वप्रथम भेट घेऊन त्यांचे अभिनंदन देखील केले.
एवढंच न्हवे तर पवार कुटुंबावर टीका करून व्यक्तीगत राजकीय नुकसान करून घेतल्याची सलही शिवतारे यांनी
व्यक्त केली. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी
जाहीर झाली आणि शिवतारे यांनी अजित पवार यांच्याकडून झालेल्या अपमानाची परतफेड करण्याचा चंग बांधला आहे.
यावरून शिवसेना व राष्ट्रवादी असा संघर्ष पेटला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांना दोन वेळा मुंबईत बोलावून घेत समजूत काढायचा प्रयत्न केला.
यानंतरही शिवतारे ऐकत नाहीत. विशेष असे की, मूळचे शिवसेनेचे असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या
नावाने विचारमंच सुरू करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने विचारमंच स्थापन करून निवडणूक लढवायची
घोषणा केली. यापुढे जाऊन कमळ या चिन्हावर देखील निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
गेली दोन आठवडे त्यांच्या या घोषणा सुरू असताना भाजपच्या नेत्यांकडून कुठलीच गंभीर प्रतिक्रिया उमटत
नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते सावध झाले आहेत. शिवतारे यांच्या भूमिकेमागे नेमके कोण ?
याचा शोध घेतला जात आहे. अजित पवार यांना मैदानात गाठून पाठीवर वार तर होत नाहीना? या चर्चेने जोर पकडला
असून पवार यांचे कार्यकर्ते सावध झाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik City Police | नाशिक : गोवंश मासाची वाहतुक विक्री करणाऱ्या 8 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई (Video)

Shivsena UBT On Modi Govt | …तर केजरीवाल अजित पवारांसारखे भाजपाचे नवे शंकराचार्य झाले असते, ठाकरेंच्या शिवसेनेचा मोदी सरकारवर घणाघात

Pune Crime News | पुणे : भांडण सोडवणं बेतलं जीवावर, मारहाणीत 57 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू