Bacchu Kadu | ‘आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाही…’, रवि राणांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बच्चू कडूंची जीभ घसरली

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला. मात्र, या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या अपक्ष आमदारांमध्ये (Independent MLA) मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे मंत्रिपदासाठी स्पर्धेत आहेत. परंतु रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. रवी राणा यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची जीभ घसरली आहे.

 

मी गुवाहाटीला (Guwahati) जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैय्या, पैसे सबका रुपया,
असे म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती.
या टीकेवर पलटवार करताना बच्चू कडू यांची जीभ घसरली. ते म्हणाले, अबे हरामखोराची औलाद… आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर तू मंत्रिपदाच्या शर्यतीत नसता.
तू आता मंत्रिपदाच्या शर्यतीत रंग लावून आहे, असं बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले.

 

तसेच आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाहीत, असं म्हणत बच्चू कडू यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्यावरही नाव घेत टीका केली.
दरम्यान बच्चू कडू यांनी शिंदे गटाला (Shinde Group) पाठिंबा दिला आहे.
तर रवी राणा यांनी भाजपला (BJP) पाठिंबा दिला आहे.
त्यामुळे सत्तेत असलेले दोन आमदार एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे भाजप-शिंदे गट युतीतही संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

Web Title : –  Bacchu Kadu | prahar leader and mla bacchu kadu hits back to mla ravi rana in amravati mp navneet rana

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा