Bachchu Kadu | आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी बच्चू कडूंच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर गुवाहाटीला जाऊन 50 कोटी घेतल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात दोघांकडून देखील एकमेकावर टीका केली जात होती.

 

या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना, आता महिला मुक्ती मोर्चा संघटनेने (Mahila Mukti Morcha Sanghatana) या वादात प्रवेश केला आहे. दोन आमदारांच्या वादात महिलांचा विनाकारण अपमान होत असल्याची तक्रार महिला मुक्ती मोर्चाने दिली आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रवी राणा यांच्याबाबत टीका करताना बच्चू कडू यांनी महिला वर्गाचा अपमान केला, असा आरोप महिला मुक्ती मोर्चाने केला आहे. कडूंवर अमरावतीमधील राजापेठ पोलिस ठाण्यात (Rajapet Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.

रवी राणा आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचे वाद संपूर्ण अमरावती जिल्ह्याला परिचित आहेत. कडू हे गुवाहाटीला पळून गेलेल्या आमदारांपैकी एक होते. त्यामुळे त्यांनी 50 कोटी रुपये खाल्ले आहेत, असा आरोप राणा यांनी केला होता. त्यावर संताप व्यक्त करत कडू यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत पैसे घेतल्याचे पुरावे दाखल करण्याचे आव्हान राणा यांना केले होते. अन्यथा आपण वेगळा निर्णय घेऊ, असे कडू यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितले होते. यावेळी राणा यांच्यावर आगपाखड करताना, कडू यांची जीभ घसरली होती. कडू म्हणाले होते, रवी राणा जर एका बापाची औलाद असतील, तर त्यांनी मी पैसे घेतल्याचे पुरावे द्यावे अन्यथा आम्ही त्यांना ‘हिजडा’ म्हणून घोषित करू. तसेच राणांनी पुरावे दिले, तर त्यांच्या घरची भांडी घासू.

 

त्यांच्या या वक्तव्याने महिला आणि तृतिय पंथीयांच्या भावना दुखावल्या गेल्याने महिला मुक्ती मोर्चाने त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

 

Web Title :- Bachchu Kadu | an indictable case has been filed against independent mla bachu kadu

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gujarat Election 2022 | निवडणूक आयोगाचा निर्णय ! गुजरातमध्ये विधानसभेपूर्वी 900 अधिकार्‍यांच्या बदल्या, जाणून घ्या कारण

Narayan Rane | ‘पंचवीस पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावला’ – फेसबूक बहाद्दर

Tata Airbus Project | काँग्रेसचा घणाघाती आरोप, शिंदे फडणवीस सरकार गुजरातचे एजंट! प्रकल्पांपाठोपाठ मुंबई सुद्धा त्यांना देऊन टाकतील