Bachchu Kadu | फडणवीसांच्या भेटीपूर्वी बच्चू कडू म्हणाले – ‘मला वाद वाढवायचा नाही, कडू-राणा वादावर…’

मुंबई : शिंदे गटासोबत (Shinde Group) गुवाहटीला जाण्यासाठी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पैसे घेतल्याचा आरोप भाजपा (BJP) समर्थक आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला होता. यानंतर या दोन नेत्यांमधील वाद विकोपाला गेला आहे. दोघांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारीही दाखल केल्या आहेत. कालपरवा फडणवीसांनी राणांची कानउघाडणी केली, त्यानंतर राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली परंतु पुन्हा दोघांमध्ये वादंग सुरू झाला आहे. आज या वादावर तोडगा काढण्यासाठी बच्चू कडू (Bachchu Kadu) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत.

दिलगीरी व्यक्त केल्यानंतर सुद्धा आमदार रवि राणा चिथावणीखोर वक्तव्य करत असल्याबाबत विचारले असता कडू म्हणाले, पब्लिक है, पब्लिक जानती है. हा वाद वाढवायचा नाही. आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. आपण चार पावले मागे घेऊ, अधिक चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ. या वादात आपली ऊर्जा संपवू नका, असे मी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा यांनी दिलगीरी व्यक्त केली.
पण पुन्हा चिथावणीखोर वक्तव्य करताना म्हटले की, कुणी दम देऊन बोलत असेल,
तर त्याला घरात घुसून मारण्याची देखील हिंमत आहे. यावर बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी म्हटले की,
रवी राणांनी तलवार घेऊन यावे, मी फुल घेऊन तयार आहे. त्यांना माझ्या शरीराचे किती तुकडे करायचे आहेत,
त्यांनी सांगावे. मी हात सुद्धा लावणार नाही. त्यांनी तारीख सांगावी, मी मरण्यासाठी तयार राहतो.
कोणत्या चौकात येऊ हे सुद्धा त्यांनी सांगावे, कडू म्हणाले. हा वाद पुन्हा वाढत असल्याने आणि राणा
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीला सुद्धा जुमानत नसल्याने कडू आज फडणवीसांची भेट घेणार आहेत.

Web Title :- Bachchu Kadu | mla bachchu kadu to meet deputy cm devendra fadanvis today commented on conflicts with ravi rana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule | कवितेच्या माध्यमातून खा. सुळेंचे संभाजी भिडेंवर टीकास्त्र ‘तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली‘

Pune Fire News | कोंढव्यातील क्लिनिकला आग, कोणीही जखमी नाही

Gautami Patil | सांगलीत झालेल्या घटनेनंतर गौतमी पाटीलनी पत्रकार परिषद घेत केला ‘हा’ मोठा खुलासा (VIDEO)