Bachchu Kadu On Sudhir Mungantiwar | …बच्चू कडूंची मुनगंटीवारांवर बोचरी टीका, म्हणाले – ‘आता यांना खाजवायलाही नखं राहिली नाहीत’

मुंबई : Bachchu Kadu On Sudhir Mungantiwar | छत्रपत्री शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी (Chhatrapati Shivaji Maharaj’s Wagh Nakh) अफजल खानाला ठार केले ती वाघनखे आम्ही लंडनहून महाराष्ट्रात आणणार आहोत, असा मोठा गाजावाजा महायुती सरकारने केला होता. विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे यासाठी इंग्लंडला गेले सुद्धा, पण हात हलवत परत आले. यामुळे राज्य सरकारचे हसे झाले आहे. यावरून विरोधी पक्षांनी चिमटे काढण्यास सुरूवात केली आहे. आज बच्चू कडू यांनी याच मुद्द्यावरून मनगंटीवारांची खिल्ली उडवली आहे. (Bachchu Kadu On Sudhir Mungantiwar)

प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू म्हणाले, सुधीरभाऊ, वाघनखे आणायला गेले होते. त्यांनी वाघनखे तर आणलीच नाहीत. पण आता त्यांना खाजवायलाही नखं राहिली नाहीत. ५०-६० लाख रुपये खर्च करून सुधीर मुनगंटीवार इंग्लंडला गेले आणि मोकळ्या हाताने परतले, ही बाब मला आवडली नाही. (Bachchu Kadu On Sudhir Mungantiwar)

बच्चू कडू म्हणाले, ५०-६० लाख रुपये खर्च करून जाण्यापेक्षा हे काम फोनवरूनही झाले असते. मोदीजी डिलीटल इंडिया म्हणतात आणि आमचे मंत्री तिथे व्यक्तीश: जातात आणि मोकळ्या हाताने परत येतात. सुधीरभाऊंनी असे करावे, हे चुकीचे आहे. ते मोठे देशभक्त मंत्री आहेत.

कडू म्हणाले, त्यांनी वाघनखे आणली असती, तर चांगली गोष्ट होती. दोन-तीन वर्षांसाठी वाघनखे उसणे आणणे, ही त्यांच्या डोक्यातील कल्पनाही चांगली आहे. आम्हीही तुमच्याबरोबर येतो, आपण वाघनखे लुटूनच आणू, अशी खिल्ली बच्चू कडू यांनी उडवली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘…तेव्हापासून हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार
ठाकरेंना राहिला नाही’, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल (व्हिडिओ)

Pune Crime News | अश्लील चाळे करुन महिलेचा भररस्त्यात विनयभंग, मगरपट्टा परिसरातील घटना; दोघांना अटक

Eknath Khadse On Udayanraje Bhosale | ‘शरद पवारांनी मार्गदर्शक व्हावं’,
उदयनराजे यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर,’उदयनराजेंनी आधी…’

Mumbai Pune Expressway | महत्वाची बातमी! पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज एक तासांचा ब्लॉक

Ajit Pawar On Meera Borwankars Allegations | मीरा बोरवणकरांचे आरोप अजित पवारांनी फेटाळले, म्हणाले-‘जमिनींचा लिलाव करण्याचा अधिकार…’

अश्लील बोलून महिलेचा विनयभंग, पतीला पोलीस चौकी बाहेर धमकी देणाऱ्या दोन भावांवर FIR; वाघोली परिसरातील