Pune Crime News | अश्लील चाळे करुन महिलेचा भररस्त्यात विनयभंग, मगरपट्टा परिसरातील घटना; दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | किराणा साहित्य आणण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार हडपसर परिसरातील मगरपट्टा येथील सार्वजनिक रस्त्यावर घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) दोघांना अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.14) रात्री साडेनऊ वाजता घडला आहे. (Pune Crime News)

रशिद उर्फ सल्लु खलिल शेख Rashid alias Sallu Khalil Shaikh (वय-33), शुभम पुरुषोत्तम मरगणे Shubham Purushottam Margane (वय-26) यांच्यावर आयपीसी 354, 354अ, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत शिंदे वस्ती येथे राहणाऱ्या 30 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) रविवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला या किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी जात होत्या.
त्यावेळी आरोपींनी त्यांच्या पाठिमागून येऊन छेड काढली. तसेच त्यांच्यासोबत अश्लील चाळे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. महिला किराणा दुकानात गेल्या असता आरोपींनी त्याठिकाणी महिलेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्यासोबत गैरकृत्य करुन त्यांची लैंगिक छळवणुक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘…तेव्हापासून हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार
ठाकरेंना राहिला नाही’, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल (व्हिडिओ)

Eknath Khadse On Udayanraje Bhosale | ‘शरद पवारांनी मार्गदर्शक व्हावं’,
उदयनराजे यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर,’उदयनराजेंनी आधी…’

Mumbai Pune Expressway | महत्वाची बातमी! पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज एक तासांचा ब्लॉक

Ajit Pawar On Meera Borwankars Allegations | मीरा बोरवणकरांचे आरोप अजित पवारांनी फेटाळले, म्हणाले-‘जमिनींचा लिलाव करण्याचा अधिकार…’