Bachchu Kadu | राज्यपाल, चंद्रकांत पाटलांचा उल्लेख करत बच्चू कडूंचं मोठं विधान; “…त्यांना रट्टा दिला पाहिजे”

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आडमुठेपणा आणि महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जाणे आदी मुद्यांवर महाविकास आघाडीने 17 डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी पोलिसांनी देखील परवानगी दिली असून, उद्या हा मोर्चा होणार आहे. या मोर्चावर अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. कोणी जाणूनबुजून महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करत असले, तर त्यांना रट्टा दिला पाहिजे असे विधान बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केले.

 

महाराष्ट्रात होऊन गेलेल्या महापुरुषांबद्दल महाविकास आघाडीला प्रेम आहे, ही चांगली गोष्ट आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्राकांत पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्यापैकी कोणीही ती विधाने करायला नको होती. शब्द चुकून बोलणे आणि जाणूनबुजून बोलणे यात फरक आहे. महाराष्ट्रतील आणि देशातील महापुरुषांबद्दल कोणीही जाणूनबुजून अपमानजनक बोलत असेल, तर तो कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही पदावर असो, त्याला रट्टा दिला पाहिजे. कोणीही या गोष्टींचे भांडवल करून महापुरुषांबद्दल राजकारण करू नये. केव्हातरी आमच्याही तोंडून चुकीचे निघून जाते. पण त्यानंतर लगेचच क्षमा मागितली पाहिजे. राज्यपालांना देखील ते करण्यास हरकत नसावी, असे यावेळी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नमूद केले.

 

दरम्यान, महाविकास आघाडीकडून विविध मागण्या आणि निषेधांसाठी मुंबईत शनिवारी 17 तारखेला महामोर्चा निघणार आहे.
या मोर्चात मोठ्या प्रमाणात जनता सहभागी होण्याची शक्यता आहे.
यावेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योग आणि विविध मुद्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार आहेत, यात शंका नाही.

 

Web Title :- Bachchu Kadu | prahar sanghtna bachchu kadu on mahavikas aghadi morcha governor bhagat singh koshyari bjp chandrakant patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune CP Retesh Kumaarr | रितेश कुमार यांनी स्विकारली पुणे पोलिस आयुक्तपदाची सूत्रे (VIDEO)

Sanjay Raut | “कुणालाही हे मान्य नाही की राजभवनात बसून…”, संजय राऊतांची राज्यपालांवर टीका

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांची सुनावणी लांबणीवर, विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट